सातारकर यांना नारायण सुर्वे पुरस्कार

By Admin | Updated: October 14, 2015 22:44 IST2015-10-14T22:42:31+5:302015-10-14T22:44:10+5:30

सातारकर यांना नारायण सुर्वे पुरस्कार

Narayana Survey Award for Satkar | सातारकर यांना नारायण सुर्वे पुरस्कार

सातारकर यांना नारायण सुर्वे पुरस्कार

सिडको : सिंहस्थनगर येथील कविवर्य नारायण सुर्वे सार्वजनिक वाचनालयातर्फे देण्यात येणारा राज्यस्तरीय कविवर्य नारायण सुर्वे साहित्य पुरस्कार नांदेड येथील डॉ. योगिनी सातारकर-पांडे यांच्या ‘जाणिवेचे हिरवे कोंभ’ या काव्यसंग्रहाला जाहीर करण्यात आल्याची माहिती वाचनालयाचे सचिव राजू नाईक यांनी दिली.
या पुरस्काराचे वितरण सुर्वे यांच्या जयंतीदिनी येत्या १६ आॅक्टोबर रोजी सायंकाळी नाशिक येथील परशुराम साईखेडकर नाट्यगृहात करण्यात येणार आहे. पाच हजार रुपये रोख, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे. सदरचा पुरस्कार डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाठा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांच्या हस्ते वितरित करण्यात येणार आहे. पुरस्कारार्थी डॉ. सातारकर नांदेड येथील स्वामी रामानंदतीर्थ मराठवाडा विद्यापीठात इंग्रजीच्या प्राध्यापिका आहेत. राज्य व राष्ट्रीय पातळीवरील महत्त्वाच्या चर्चासत्रात, तसेच परिषदांमध्ये त्या शोधनिबंध सादर करतात. यापूर्वी त्यांना उद्गीर येथील साहित्य साधना पुरस्कार मिळालेला आहे. पुरस्कार वितरण सोहळ्यास साहित्य रसिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन नाईक यांनी केले आहे. (वार्ताहर)

Web Title: Narayana Survey Award for Satkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.