शिवसैनिकांकडून निफाडमध्ये नारायण राणे यांचा निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 04:20 IST2021-08-25T04:20:10+5:302021-08-25T04:20:10+5:30

निफाडच्या शिवसैनिकांनी नारायण राणेंच्या अटकेसाठी जोरदार घोषणाबाजी करत त्यांचा तीव्र निषेध केला. निफाडचे पोलीस निरीक्षक रंगराव सानप यांना यावेळी ...

Narayan Rane's protest in Niphad by Shiv Sainiks | शिवसैनिकांकडून निफाडमध्ये नारायण राणे यांचा निषेध

शिवसैनिकांकडून निफाडमध्ये नारायण राणे यांचा निषेध

निफाडच्या शिवसैनिकांनी नारायण राणेंच्या अटकेसाठी जोरदार घोषणाबाजी करत त्यांचा तीव्र निषेध केला. निफाडचे पोलीस निरीक्षक रंगराव सानप यांना यावेळी तालुका शिवसेनेच्या वतीने नारायण राणे यांच्यावर निफाडमध्येही गुन्हा दाखल करण्याचे निवेदन देण्यात आले.

यावेळी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख नीलेश पाटील, तालुकाप्रमुख सुधीर कराड, जिल्हा युवा अधिकारी विक्रम रंधवे, आशिष शिंदे, सभापती सुलभा पवार, अनिल पाटील कुंदे, खंडू बोडके, पंचायत समिती सदस्य शिवा पाटील, सोमनाथ पानगव्हाणे, प्रकाश महाले, गोटू बागुल, संजय कुंदे, संजय धारराव, ललित गिते, शंकर संगमनेरे, बाळासाहेब चारोस्कर, दीपक कुशारे, देवेंद्र काजळे, वकील पठाण, प्रमोद उगले आदी शिवसैनिक उपस्थित होते.

(२४ सायखेडा)

निफाड तालुका शिवसेनेच्या वतीने नारायण राणे यांच्या निषेधाचे निवेदन रंगराव सानप यांना देताना अनिल कदम. समवेत पदाधिकारी.

240821\24nsk_51_24082021_13.jpg

निफाड तालुका शिवसेनेच्यावतीने नारायण राणे यांच्या निषेधाचे निवेदन रंगराव सानप यांना देताना अनिल कदम समवेत पदाधिकारी.

Web Title: Narayan Rane's protest in Niphad by Shiv Sainiks