शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तरच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात”; पुतण्याची काकांना थेट ऑफर; पण ठेवली मोठी अट
2
ठाकरे बंधूंच्या युतीला काँग्रेसचा ग्रीन सिग्नल? संजय राऊत म्हणतात, “आमची चर्चा झाली आहे...”
3
'क्रिमीलेअर'बाबत केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; उत्पन्नाची मर्यादा बदलणार?
4
पाकिस्तानातून अवैधपणे शस्त्रास्त्रे पुरवणाऱ्या सलीम पिस्तुलला मुसक्या बांधून आणलं भारतात
5
केवळ आठवणीतच राहणार 'ही' १३३ वर्ष जुनी कंपनी? बंद होण्याच्या मार्गावर, प्रत्येक घराशी आहे हिचं नातं
6
मोहम्मद रिझवान बॉल सोडायला गेला अन् क्लीन बोल्ड झाला! अंपायरनं अशी उडवली खिल्ली (VIDEO)
7
सरकार LIC मधील हिस्सा विकणार, पुढच्या आठवड्यापासून प्रक्रिया सुरू; शेअर विक्रीसाठी रांग
8
गणेशोत्सवासाठी मुंबईहून दोन मोफत ट्रेन सुटणार; टाईम टेबल, तिकीटे कधी मिळणार..., नितेश राणेंची घोषणा...
9
महागाई भत्त्याची १८ महिन्यांची थकबाकी मिळणार का? सरकारने संसदेत दिले उत्तर
10
स्वामींची सेवा न चुकता-नियमितपणे करतो, पण स्वामीकृपा झाली हे कसे ओळखावे? ‘हे’ अनुभव येतातच!
11
Gold Silver Price 13 August 2025: सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल, Silver च्या दरात ₹१५३७ ची तेजी; खरेदीपूर्वी पाहा काय आहे नवी किंमत?
12
‘मत चोरी’वरून भाजपाचा काँग्रेसवर प्रतिहल्ला, रायबरेली आणि डायमंड हार्बर येथील उदाहरण देत घेरले   
13
भाजपा विरुद्ध भाजपा लढाईत विरोधी पक्ष बनला 'विजेता'; संसदेत राहुल गांधींनी टाकला डाव, काय घडलं?
14
ईडी चौकशी करत असलेल्या सुरेश रैनाकडे किती संपत्ती? उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत कोणता?
15
भटक्या कुत्र्यांबाबतीत कोर्टाच्या निर्णयाची चर्चा, तिकडे आर्चीने शेअर केला क्युट व्हिडिओ; म्हणाली...
16
जेवढे जन्माला येतायेत, त्यापेक्षा १० लाख जास्त मरतायेत; भारताच्या मित्र देशात 'सायलेंट इमरजंन्सी'!
17
ठाकरे बंधू दादरच्या कबुतरखाना विरोधातील आंदोलनात दिसणार? ‘या’ समितीचे सहभागी होण्याचे आवाहन
18
Jaiprakash associates limited: ₹४ चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणुकदारांच्या उड्या; आता बंद करावं लागलं ट्रेडिंग, अदानींचं जोडलंय नाव
19
चंद्रावर घेऊन जातो...! नासाच्या इंटर्नने चंद्रावरून आणलेला दगड चोरला, बेडखाली ठेवला अन् गर्लफ्रेंडसोबत रोमान्सही केला...

‘त्या’ कुंटणखान्याची मालकीण ‘नानी’सह दोघा नराधमांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2017 00:51 IST

बांगलादेशी मुलीची देहविक्रयासाठी खरेदी करणाºया सिन्नरच्या मुसळगावमधील ‘त्या’ कुंटणखान्याची मालकीण नानी ऊर्फ मंगल नंदकिशोर गंगावणेसह पीडितेवर बलात्कार करणारा नानीचा मुलगा विशाल नंदकिशोर गंगावणे व दलाल सोनू नरहरी देशमुख यांना गुरुवारी (दि. १४) पोलिसांनी अटक केली. या प्रकरणी सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून, त्यातील तिघांना अटक झाली आहे.

नाशिक : बांगलादेशी मुलीची देहविक्रयासाठी खरेदी करणाºया सिन्नरच्या मुसळगावमधील ‘त्या’ कुंटणखान्याची मालकीण नानी ऊर्फ मंगल नंदकिशोर गंगावणेसह पीडितेवर बलात्कार करणारा नानीचा मुलगा विशाल नंदकिशोर गंगावणे व दलाल सोनू नरहरी देशमुख यांना गुरुवारी (दि. १४) पोलिसांनी अटक केली. या प्रकरणी सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून, त्यातील तिघांना अटक झाली आहे.  भारत फिरविण्याच्या बहाण्याने बांगलादेशमधील अल्पवयीन मुलीला देहविक्रयाच्या नरकात तिच्या मावशीने ढकलले. दलालामार्फत मुसळगाव  परिसरात चालणाºया कुंटणखान्याच्या ‘नानी’ला दहा महिन्यांपूर्वी भाचीला विकले होते. यानंतर पीडित मुलीचा सौदा नानीने मुंबईच्या कुंटणखान्यासाठी केला. तत्पूर्वी सोनू व विशाल यांनी पीडितेवर बलात्कार केल्याचे पोलिसांनी पत्रकार परिषदेत सांगितले.   काही महिने मुंबईला सदर मुलगी राहिली व तेथून पुन्हा तिला कोलकात्याच्या ‘त्या’ बाजारात देहविक्रयसाठी विकले गेले, अशा तिच्या संपूर्ण प्रवासातील नरकयातना पीडित मुलीने बुधवारी नाशकात माध्यमांसमोर मांडल्या. याप्रकरणाने ग्रामीण पोलीस दलासह अवघ्या राज्याला हादरा बसला. पोलीस अधीक्षक संजय दराडे यांनी याबाबत दखल घेऊन तत्काळ उपअधीक्षक विशाल गायकवाड यांना त्वरित तपासचक्रे फिरवून संशयित आरोपींना अटक करण्याचे फर्मान सोडले. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक करपे यांच्या पथकाने सिन्नर येथे जाऊन संशयित नानीचा मुलगा व दलाल यांना बुधवारी मध्यरात्री ताब्यात घेतले व त्यानंतर नानीच्या सकाळी मुसक्या आवळल्या. अखेर पीडित मुलीचा मुंबईवरून थेट कोलकाताच्या देहविक्रय बाजारात सौदा झाला आणि त्या ठिकाणी पुन्हा तिच्या वाट्याला वासनेचा बाजार आल्याने ती पीडित अल्पवयीन मुलगी अनेकांच्या वासनेची बळी ठरली.  ग्रामीण पोलिसांनी नानीसह पीडित मुलीची मावशी संशयित आरोपी माजिदा अब्दुल (पूर्ण नाव माहीत नाही) यांच्याविरुद्ध अल्पवयीन मुलीला पळवून आणणे, देहविक्रयच्या व्यवसायाला लावणे, पीडितेच्या इच्छेविरुद्ध देहविक्रयसाठी प्रवृत्त करणे तसेच पिटा कायद्यानुसार विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे. दोघा नराधमांवर बलात्काराचा गुन्हा पोलिसांनी पीडित मुलीच्या जबाबावरून नोंदविला आहे, अशी माहिती दराडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. पीडितेची मावशी व बांगलादेशहून नाशिकपर्यंत मुलीला घेऊन येणारा दलाल आणि मुंबईमध्ये खरेदी करणारी महिला व कोलकात्याला पोहचविणारे दलाल अद्याप फरार असून, तीन पथकांमार्फत सर्वांना अटक केली जाणार आहे. हे संपूर्ण प्रकरण सखोलपणे हाताळून पाळेमुळे ग्रामीण पोलीस उखडून फेकणार असल्याचा दावा दराडे यांनी केला. पोलिसांचा जिल्हाधिकाºयांकडे प्रस्तावबांगलादेशमधील अल्पवयीन मुलीच्या खरेदी-विक्री प्रकरणानंतर पुन्हा प्रकाशझोतात आलेला नाशिकमधील सिन्नर तालुक्यातील मुसळगाव औद्योगिक वसाहतीमधील वासनेचा बाजार सील करण्याचे संकेत पोलीस अधीक्षक संजय दराडे यांनी पत्रकार परिषदेत दिले. पिटा कायद्यानुसार तसा प्रस्ताव पोलिसांनी तयार केला असून, जिल्हाधिकाºयांच्या शिक्कामोर्तबसाठी प्रस्ताव पाठविण्यात येणार असून, त्यानंतर त्यांच्या आदेशानुसार मुसळगाव वासनेचा बाजार पूर्णपणे ‘सील’ करण्यात येणार असल्याचे दराडे यांनी सांगितले. एकूणच या संपूर्ण कारवाईकडे आता नाशिक जिल्ह्याचे नव्हे तर राज्याचे लक्ष लागले आहे.जिद्द, चिकाटीच्या जोरावर मुलीने केले धाडसजिद्द, चिकाटीच्या जोरावर वासनेच्या बाजारातून बाहेर पडण्यासाठी ‘त्या’ पीडित बालिकेने सातत्याने दहा महिने संघर्ष करीत यश मिळविले. कुंटणखान्याच्या भिंती भेदून तिने कोलकात्याहून पलायन करून नाशिक गाठले. तीन महिने नाशिकमध्ये जीव मुठीत घेऊन राहणाºया पीडित मुलीने अखेर धाडस केले आणि माध्यमांसमोर येऊन ‘खाकी’च्या क्रूरतेपासून तर बांगलादेश-भारत सीमेवरून होणाºया मुलींच्या तस्करीचा पर्दाफाश केला.या प्रकरणात सिन्नर पोलिसांची भूमिका संशयास्पद असल्याचे बोलले जात आहे. याबाबतही तपास केला जाणार असून, दोषी आढळणाºया पोलिसांवरही कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. गायकवाड व स्थानिक ग्रामीण गुन्हे शाखेचे तीन पथक पुढील तपास करत आहेत.- संजय दराडे, पोलीस अधीक्षक, नाशिक

टॅग्स :Police Stationपोलीस ठाणेCrimeगुन्हा