नांदूरशिंगोटे ते शिवनेरी अभिवादन मशाल रॅली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:18 IST2021-09-06T04:18:01+5:302021-09-06T04:18:01+5:30
नांदूरशिंगोटे येथे असलेल्या क्रांतिवीर भागोजी नाईक यांच्या विजयी स्मारकास अभिवादन करुन मशाल रॅली काढण्यात आली. आदिवासी समाजाचे नेते तुकाराम ...

नांदूरशिंगोटे ते शिवनेरी अभिवादन मशाल रॅली
नांदूरशिंगोटे येथे असलेल्या क्रांतिवीर भागोजी नाईक यांच्या विजयी स्मारकास अभिवादन करुन मशाल रॅली काढण्यात आली. आदिवासी समाजाचे नेते तुकाराम मेंगाळ यांनी आदिवासी वीरांनी दिलेल्या बलिदानानिमित्त मनोगत व्यक्त केले. शिवनेरीवर १,६००च्या वर आदिवासी कोळी महादेव शूरवीरांच सामुदायिक शिरकाण केले. या निमित्ताने दरवर्षी शिवनेरी येथे अभिवादन दिन साजरा केला जातो. भागोजी नाईक यांच्या स्मारकापासून मशाल रॅलीचे प्रस्थान झाले.
यावेळी तुकाराम मेंगाळ, देवराम खेताडे, अलका पवार, राजेंद्र दराडे, महेंद्र सानप, राजेंद्र बेंडकुळे, शरद लाहांगे, सर्जेराव भारमल, देविदास जगताप, विठ्ठल खोकले, दत्ता जाधव, विक्रम कवटे, एकनाथ बागड, रामनाथ बर्डे, चंद्रशेखर रोकडे, चिमाजी मेंगाळ, सूरज पवार, एकनाथ पथवे, सागर पवार, शरद पवार, ज्ञानेश्वर माळी, गोरख माळी, गणेश पवार, शिवाजी बर्डे, प्रकाश पवार, बापू पवार, संगीता पवार, अपर्णा पवार, शीतल पवार आदींसह सिन्नर, दिंडोरी, सटाणा, मालेगाव येथील आदिवासी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
फोटो - ०१ नांदूरशिंगोटे १
नांदूरशिंगोटे येथे महादेव कोळी चौथरा बलिदान दिनानिमित्त क्रांतिवीर भागोजी नाईक यांना अभिवादन करताना आदिवासी समाजाचे कार्यकर्ते.
050921\05nsk_18_05092021_13.jpg
नांदूरशिंगोटे येथे महादेव कोळी चौथरा बलिदान दिनानिमित्त क्रांतीवीर भागोजी नाईक यांना अभिवादन करतांना आदीवासी समाजाचे कार्यकर्ते.