शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

नांदूरशिंगोटे : पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2020 17:49 IST

नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे परिसरात गेल्या आठवड्यात मृगाच्या पावसाने दमदार हजेरी लावल्याने शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील पिकांची पेरणी केली आहे. तर काही ठिकाणी पेरणी अंतिम टप्प्यात आली आहे. पेरणी नतंर पाऊस उघडल्याने बळीराजाच्या नजरा आकाशाकडे लागल्या आहेत.

ठळक मुद्देखरीप हंगामातील पेरणी अंतिम टप्प्यात

नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे परिसरात गेल्या आठवड्यात मृगाच्या पावसाने दमदार हजेरी लावल्याने शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील पिकांची पेरणी केली आहे. तर काही ठिकाणी पेरणी अंतिम टप्प्यात आली आहे. पेरणी नतंर पाऊस उघडल्याने बळीराजाच्या नजरा आकाशाकडे लागल्या आहेत.रब्बी हंगामातील आलेला कटू अनुभव बाजूला सारून बळीराजाने यंदाच्या खरीप हंगामासाठी आपली कंबर कसली आहे. तालुक्यातील नांदूरशिंगोटे, भोजापूर खोरे, दापूर, चापडगाव, माळवाडी, मानोरी, निऱ्हाळे, मऱ्हळ, चास आदी गावात मागील आठवड्यात पावसाने समाधानकारक हजेरी लावली. त्यामुळे खरीप हंगामाच्या कामात शेतकरी व्यस्त झाला आहे. पेरणी सह खुरपणी व पिकांच्या आंतरमशागतीच्या कामात वेग घेतला आहे. यंदा सुरुवातीला चांगला पाऊसझाल्याने पाण्याची काळजी मिटली या आशेवर बळीराजाने सोयाबीन, भुईमूग, बाजरी, मका, ज्वारी आदी बियाणे खरेदी करून पेरणी केली. तसेच काही भागात नगदी पिके म्हणून भाजीपाला पिकांची लागवड करण्यात आली आहे. त्यात प्रामुख्याने कोथिंबीर, मेथी, वालवड, टोमॅटो, गाजर, कोबी, कांदा आदींना पसंती दिली आहे. तसेच पिकांना खत घेण्यासाठी शेतकरी कृषी सेवा केंद्राच्या दुकानांवर गर्दी करत आहेत. लॉकडाऊन काही प्रमाणात शिथिल झाले असले तरी भविष्यात खत मुबलक प्रमाणात उपलब्ध होईल का नाही याबाबत शेतकरी साशंक आहेत. त्यामुळे पिकांना पुढे द्यावयाच्या खतांची मात्रा विचारात घेऊन शेतकरी खताची खरेदी करत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. पेरणीनतंर पावसाने दडी मारल्याने खरीप हंगामाचे भांडवल वाया जाते की काय याची भीतीबळीराजाला वाटू लागली आहे.

टॅग्स :RainपाऊसFarmerशेतकरी