शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

नांदूरशिंगोटेत आगीत संसारोपयोगी साहित्य खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2020 00:04 IST

नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे येथे पत्र्याच्या दुमजली इमारतीच्या वरच्या खोलीला रविवारी सकालच्या सुमारास अचानक आग लागली. त्यात रहात असलेल्या भाडेकरुचा संपूर्ण धान्य, कपडे, संसारोपयोगी वस्तू आदी संसार जळून खाक झाला. या घटनेमुळे आदिवासी कुटुंबाचा संसार उघड्यावर आला आहे. परिसरातील नागरिकांनी समयसूचकता दाखवत आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केला.

ठळक मुद्दे पहिल्या मजल्यावर दोन खोल्या भाडेकरुंना

नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे येथे पत्र्याच्या दुमजली इमारतीच्या वरच्या खोलीला रविवारी सकालच्या सुमारास अचानक आग लागली. त्यात रहात असलेल्या भाडेकरुचा संपूर्ण धान्य, कपडे, संसारोपयोगी वस्तू आदी संसार जळून खाक झाला. या घटनेमुळे आदिवासी कुटुंबाचा संसार उघड्यावर आला आहे. परिसरातील नागरिकांनी समयसूचकता दाखवत आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केला.येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकालगत तुळशीराम शेळके यांची दुमजली इमारत आहे. पहिल्या मजल्यावर दोन खोल्या भाडेकरुंना दिलेल्या आहेत. गावातीलच सुरेश बर्डे हे पत्नीसह येथे राहत असून मोलमजुरी करुन आपला उदरर्निवाह करतात. नेहमप्रमाणे दररोज सकाळी घरातील आपले काम आटोपून दोघेही मोलमजुरीसाठी गेले होते. सकाळी साडेअकरा ते पावणेबाराच्या सुमारास पहिल्या मजल्यावरील एका खोलीतून अचानक धुराचे लोट बाहेर येत असल्याचे घरमालक व आसपासच्या नागरिकांच्या लक्षात आले. गावातील मध्यवर्ती भागातील घराला आग लागल्याचे समाजात गावातील ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली. गल्लीतील व परिसरातील तरुणांनी आसपासच्या ठिकाणाहून पाणी आणून आग विझविण्यासाठी प्रयत्न केले.सुमारे एक तासाच्या अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली. याचदरम्यान सिन्नर नगरपालिकेच्या अग्निशमन दलाचा बंबही आला होता. अचानक घराला आग लागल्याने रोख पंधरा हजार रुपये व संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले. दरम्यान सरपंच गोपाल शेळके, दीपक बर्के, रामदास सानप, प्रकाश सानप, नागेश शेळके, संदीप शेळके, सुरेश कुचेकर, गुलाब मोमीन, नितीन गवारे, आसीफ तांबोळी, भारत दराडे, रवींद्र शेळके यांनी मदत कार्य केले. कामगार तलाठी यांना या आगीची माहिती देण्यात आली.चौकट...आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्नछत्रपती शिवाजी महाराज चौकात राहणारे नितीन गवारे, आसिफ तांबोळी, वाहिद मणियार, गणेश तुपसुदंर, सुरेश बर्डे, गणेश शिंदे आदीसह परिसरातील युवक व महिलांनी आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. गवारे व तांबोळी यांनी आपला जीव धोक्यात घालून पहिल्या मजल्यावरील घराचा दरवाजा तोडला. हळूहळू आगीचे लोण खिडकीतून बाहेर येवू लागल्याने काही काळ घबराट निर्माण झाली होती. विद्युत पंपाच्या सहाय्याने पाण्याची फवारणी करीत आग नियंत्रणात आणली. दरम्यान घरात कोणीही नसल्याने जिवीतहानी टळली. 

टॅग्स :AccidentअपघातFairजत्रा