शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
16
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
17
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
18
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
19
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."

नंदिनी नदीच्या पुराचे पाणी ४० घरांमध्ये; कुटुंबांची वाताहत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2019 00:57 IST

नाशिक शहर आणि परिसरात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने रौद्ररूप धारण केले होते. मुसळधार पावसामुळे नंदिनी नदीला आलेल्या पुराचे पाणी लगतच्या सुमारे ४० घरांमध्ये शिरल्याने सर्व कुटुंबांची वाताहत झाली.

सिडको : नाशिक शहर आणि परिसरात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने रौद्ररूप धारण केले होते. मुसळधार पावसामुळे नंदिनी नदीला आलेल्या पुराचे पाणी लगतच्या सुमारे ४० घरांमध्ये शिरल्याने सर्व कुटुंबांची वाताहत झाली. अद्यापही घरातून चिखल काढण्याचे काम सुरू आहे. उंटवाडी व आयटीआय पुलावरून बंद करण्यात आलेल्या वाहतुकीमुळे सिडकोचा शहराशी संपर्क तुटला होता. काहीशा थंडावलेल्या पावसाने रात्रीपासून पुन्हा एकदा जोर धरल्याने अद्याप सिडकोतील जनजीवन विस्कळीत झाले असून, काही ठिकाणी आता हळूहळू परिस्थिती पूर्ववत होत आहे.गेल्या काही दिवसांपासून सिडको व अंबडसह परिसरात संततधार झालेल्या पावसामुळे मुख्य तसेच अंतर्गत रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. महापालिकेच्या सिडको बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहे. जुने सिडको बडदेनगर ते खोडेमळा येथील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहे, तसेच रस्त्यावर पाणी साचल्याने वाहनधारकांचे हाल होत आहे. याबरोबरच दत्ताचौक, विजयनगर, लेखानगर, तोरणानगर, खांडेमळा संभाजी चौक, खुटवडनगर यांसह सिडको भागातील तसेच अंबड भागातील रस्त्यांची दयनीय अवस्था झाली असून, मनपाने त्वरित डागडुजी करण्याची मागणी केली आहे.रविवारी नंदिनी नदीला आलेल्या पुरामुळे नदी पात्रालगतच्या ४० घरांमध्ये पुराचे पाणी शिरून रहिवाशांचे मोठे नुकसान झाले होते. रहिवासी सकाळी झोपेत असतानाच आलेल्या वेगवान पाण्यामुळे येथील रहिवाशांना जीव वाचविण्यासाठी संसार सोडून बाहेर पळ काढावा लागला.ग्रामस्थांना स्थलांतराची सूचनाउंटवाडीच्या दोंदे पुलावरून पाणी असल्याने वाहतूक बंद करण्यात आली होती. नदीचे पाणी खेतवानी लॉन्सपर्यंत आल्याने तीन वर्षांपूर्वीसारखी पुरसदृश स्थिती निर्माण झाली होती. पोलीस व मनपा प्रशासनाने संभाव्य धोका टाळण्यासाठी परिसरातील रहिवाशांना तसेच उंटवाडी ग्रामस्थांना स्थलांतराची सूचना दिली. पाणी ओसरल्याने वाहतूक सुरू झाली आहे.

टॅग्स :Nashik Floodनाशिक पूरriverनदीRainपाऊसnashik collector officeनाशिक जिल्हाधिकारी कार्यालय