दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी नंदिनी गोशाळेचा मदतीचा हात

By Admin | Updated: June 4, 2016 22:54 IST2016-06-04T22:41:44+5:302016-06-04T22:54:12+5:30

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी नंदिनी गोशाळेचा मदतीचा हात

Nandini Goshala's help hand for drought-hit farmers | दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी नंदिनी गोशाळेचा मदतीचा हात

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी नंदिनी गोशाळेचा मदतीचा हात

नाशिक : संपूर्ण राज्यामध्ये दुष्काळाची भीषण छाया असल्याने गुरांना चारापाणी मिळणे दुरापास्त झाले आहे. या अनुषंगाने नंदिनी गोशाळेने दुष्काळग्रस्त शेतकरी की ज्यांच्याकडे पशुधन आहे, परंतु चारा पाण्याची सोय होत नाही त्यांनी कसायाकडे ते गोधन न देता नंदिनी गोशाळेत कायमस्वरूपी देण्यात यावे, त्याचे संपूर्ण पालनपोषण करण्यात येईल. तसेच ज्या शेतकऱ्यांकडे दुधारू गोवंश आहे, परंतु त्यांच्याकडे चारा पाण्याची सोय नाही ते पशुधन तात्पुरत्या स्वरूपात संस्थेच्या नियम व अटीशर्तींवर सांभाळले जातील. उपरोक्त दोन्ही संधी निर्माण ग्रुपने उपलब्ध करून दिल्या असून, या संधीचा फायदा शेतकरी व नागरिकांनी घ्यावा तसेच या उपक्रमामध्ये ज्या कुणाला भाग घ्यावयाचा असेल वा यथासांग मदतीचा हात द्यावयाचा असेल त्यांनीही या उपक्र्रमांत सहभागी व्हावे, असे आवाहन नंदिनी गौशाळेचे विश्वस्त नेमिचंद पोद्दार यांनी केले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Nandini Goshala's help hand for drought-hit farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.