नाशिकरोड : परिसरातील शाळांमध्ये आषाढी एकादशी साजरी करण्यात आली. यानिमित्त शाळांच्या परिसरातून ग्रंथदिंडी व वृक्षदिंडी काढण्यात आली.यावेळी नगरकर गुरूकुल प्राथमिक विद्यामंदिरात आषाढी एकादशीनिमित्त ग्रंथदिंडी व वृक्षदिंडीचे आयोजन करण्यात आले होते. या दिंडीचे उद्घाटन नगरसेविका संगीता गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले.दिंडीमध्ये बालवाडी ते ७ वीचे विद्यार्थी वारकऱ्यांच्या वेशभुषेत सहभागी झाले होते. तसेच ४ थी ते ७ वीच्या विद्यार्थ्यांनी लेझीम नृत्य सादर केले. विद्यार्थ्यांनी विठ्ठलाचे नामस्मरण करत ‘वृक्षाचे करा संवर्धन धरतीचे होईल नंदनवन’ अशा घोषणा दिंडीत दिल्या.यावेळी मुख्याध्यापक संगीता पाटील, दीपक सहाणे, सुनंदा गायकवाड, दीपिका खुळे, मनीषा कुमावत, जयश्री पगारे, वंदना बोरसे, ममता भोळे, सारिका हिरे, शोभा मोकळ, चंद्रकला तांबट आदी उपस्थित होते.
नाशिकरोडला ग्रंथदिंडी, वृक्षदिंडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2019 00:35 IST