नांदगावचा पाणीपुरवठा अखेर सुरळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2021 04:15 IST2021-01-25T04:15:41+5:302021-01-25T04:15:41+5:30

नांदगाव : बिले थकविल्यामुळे खंडित करण्यात आलेला गिरणा धरणावरील ५६ खेडी नळ पाणीपुरवठा योजनेवरील खंडित करण्यात आलेला पाणीपुरवठा ...

Nandgaon's water supply is finally smooth | नांदगावचा पाणीपुरवठा अखेर सुरळीत

नांदगावचा पाणीपुरवठा अखेर सुरळीत

नांदगाव : बिले थकविल्यामुळे खंडित करण्यात आलेला गिरणा धरणावरील ५६ खेडी नळ पाणीपुरवठा योजनेवरील खंडित करण्यात आलेला पाणीपुरवठा शनिवारपासून सुरू करण्याचे आदेश जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लिना बनसोड यांनी दिले. त्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. योजनेच्या कोट्यवधी रुपयांच्या थकबाकीच्या मुद्यावरून नांदगाव पालिकेसह तालुक्यातील अठरा तर मालेगाव तालुक्यातील ३९ गावांचा पाणीपुरवठा खंडित करण्यात आला होता. त्यामुळे संबंधित गावांचा पाणी पुरवठा थांबला होता. निवडणुकीच्या ऐन धामधुमीच्या काळात पिण्याच्या पाण्याचा पुरवठा खंडित झाल्यानंतर देखील कुणाचेही याप्रकाराकडे लक्ष गेले नव्हते. शिवाय पावसाळा समाधानकारक झाला असल्यामुळे पर्यायी जलस्त्रोत्र असल्याने या प्रश्नाबद्दल कुणालाही गांभीर्य दिसून आले नव्हते. लोकमतमधून सलग तीन दिवस याबाबत वृत्त आल्याने यंत्रणा खडबडून जागी झाली व पूर्वीप्रमाणे पाणी पुरवठा सुरळीत सुरु करण्याचे आदेश यांनी आदेश दिले. गिरणा धरण प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेला यावेळी थकबाकीच्या मुद्यावर निधी देण्याचे जिल्हा परिषदेने नाकारल्याने सुमारे दोन लाख लोकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. योजनेतून येणारे शुध्द पाणी मिळाले नाही. तर इतर स्त्रोतातून उपलब्ध असलेले ‘विनाशुध्दी’करणाचे पाणी नागरिकांमध्ये आरोग्याच्या गंभीर समस्या निर्माण करेल, अशी भीती व्यक्त करण्यात येत होती.

नांदगाव शहर व ५६ खेडी व सुमारे ७५ वस्त्या यांना पाणी पुरवठा केला जातो. नगरपरिषदेकडे १ कोटी ७२ लाख रुपये थकबाकी असून त्यापैकी १२ लाख रुपये भरले आहेत. मालेगाव तालुक्यातील ३९ गावांकडे २७ लाख रुपये बाकी असून त्यांनी केवळ १ लाख ४० हजार रुपयांचा भरणा केला आहे. नांदगाव तालुक्यातील १८ गावांकडे १४ लाख रुपये बाकी असून फक्त १ लाख २० हजार रुपयांचा भरणा केला आहे. जिल्हा परिषदेने आधी थकबाकी भरा. मगच पाणी पुरवठा सुरू करू अशी भूमिका घेतल्याने १ जानेवारी २०२१ पासून गिरणा धरणाच्या उद्भवातले पंप बंद झाले. त्यामुळे नळातून येणारे पाणी बंद झाल्याने नागरिक हवालदिल झाले.

Web Title: Nandgaon's water supply is finally smooth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.