नांदगावी यंदा गणेश मंडळांच्या संख्येत वाढ

By Admin | Updated: September 8, 2016 00:40 IST2016-09-08T00:40:12+5:302016-09-08T00:40:47+5:30

नांदगावी यंदा गणेश मंडळांच्या संख्येत वाढ

Nandgaon This year, the number of Ganesh Mandals increased | नांदगावी यंदा गणेश मंडळांच्या संख्येत वाढ

नांदगावी यंदा गणेश मंडळांच्या संख्येत वाढ

नांदगाव : शहर व परिसरात गेल्या वर्षाच्या तुलनेत यावर्षी गणेश मंडळांच्या संख्येत दीडपट वाढ झाली असून, शहरातील मानाच्या गणेशाची छत्रपती शिवाजी महाराज जनसेवा मंडळातर्फे स्थापना करण्यात आली आहे.
सोमवारी दिवसभर बाजारात गणेशमूर्ती खरेदीची लगबग दिसून आली. दुपारपासूनच लहान मंडळांनी साध्या पद्धतीने आपल्या लाडक्या गणरायाला आणले. यंदा शहर व ग्रामीण भागात एकूण ९२ मंडळांची स्थापना करण्यात आली आहे.
त्यात २७ ठिकाणी ‘एक गाव एक गणपती’ उपक्रम राबविण्यात आला आहे. नांदगाव शहरात एकूण १६ मोठी मंडळे आहेत, तर ग्रामीण भागात मोठ्या मंडळांची संख्या चार आहे, तर लहान मंडळांची संख्या ४५ आहे. (वार्ताहर)

Web Title: Nandgaon This year, the number of Ganesh Mandals increased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.