नांदगावला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा द्यावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:10 IST2021-07-22T04:10:34+5:302021-07-22T04:10:34+5:30
नांदगाव : नांदगाव ग्रामीण रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा द्यावा, अशी मागणी नांदगाव भाजपा पदाधिकाऱ्यांनी केंद्रीय राज्य आरोग्य मंत्री डॉ. ...

नांदगावला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा द्यावा
नांदगाव : नांदगाव ग्रामीण रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा द्यावा, अशी मागणी नांदगाव भाजपा पदाधिकाऱ्यांनी केंद्रीय राज्य आरोग्य मंत्री डॉ. भारती पवार यांच्याकडे केली आहे. भाजपा नांदगाव शहर अध्यक्ष उमेश उगले यांच्या नेतृत्वाखाली भाजप शिष्टमंडळाने पवार यांची भेट घेऊन मागणी केली आहे. नांदगाव ग्रामीण रुग्णालय गेल्या वर्षात कोविड वरील उपचाराचे प्रमुख केंद्र म्हणून परिचित झाले आहे. वाढती लोकसंख्या व रुग्णालयात मिळणारी सेवा यामुळे येथील बाह्य रुग्ण व इतर व्याधीग्रस्त यांची संख्या वाढत आहे. डॉ पवार यांचा मंत्री झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. निवेदन देताना माजी जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र पवार, सरपंच बापूसाहेब जाधव, नांदगाव शहर अध्यक्ष उमेश उगले, आझाद आव्हाड व पदाधिकारी उपस्थित होते.
------------------------
नांदगाव भाजप शिष्टमंडळाने केंद्रीय आरोग्यमंत्री भारती पवार यांच्या सत्कारप्रसंगी राजेंद्र पवार,उमेश उगले, बापूसाहेब जाधव, आझाद आव्हाड व इतर. (२१ नांदगाव १)
210721\21nsk_11_21072021_13.jpg
२१ नांदगाव १