नांदगाव पूर : तातडीने पंचनामे करण्याच्या सुचना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:18 IST2021-09-09T04:18:27+5:302021-09-09T04:18:27+5:30
दहेगाव व इतर धरणे फुल्ल झालेली असल्याने रिक्षातून नागरिकांना सावध केले होते. पुरात संसार उघड्यावर पडलेल्या कुटुंबांना दोन वेळच्या ...

नांदगाव पूर : तातडीने पंचनामे करण्याच्या सुचना
दहेगाव व इतर धरणे फुल्ल झालेली असल्याने रिक्षातून नागरिकांना सावध केले होते. पुरात संसार उघड्यावर पडलेल्या कुटुंबांना दोन वेळच्या जेवणाची व्यवस्था व पार्सल गुप्ता लॉन्समध्ये करण्यात आली आहे. ट्रक्टर, जेसीबीने गाळ काढण्याची व दुरुस्तीची कामे सुरू केली आहेत. - राजेश कवडे, नगराध्यक्ष
----------------------
पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांचे तातडीने पंचनामे करावेत. ज्याठिकाणी पशुधनाला धोका पोहोचला आहे, त्याठिकाणी पशु वैद्यकीय मदत मिळावी. अशा सूचना तहसीलदार व प्रशासनाला केल्या आहेत. नुकसान २००९च्या पुरापेक्षा मोठे आहे.
- सुभाष कुटे, सभापती, पंचायत समिती, नांदगाव
-------------------
आता नुकसानीचा विषय आहे. कांदा रोप सडून जातील. बाजरी काढण्याच्या अवस्थेत असून, तिचे नुकसान आहे. मनमाड (६६ मिमी) व वेहेळगाव (७६ मिमी) पाऊस आहे. याठिकाणी फारसे नुकसान नाही. नांदगाव (१२४ मिमी), जातेगाव (१०८ मिमी) मोठे नुकसान आहे. जिथे मका उभा आहे तिथे अडचण नाही. मात्र, पुरात वाहून गेलेले पूर्ण नुकसान आहे.
- जगदीश पाटील, तालुका कृषी अधिकारी, नांदगाव