नांदगावला स्नेहसंमेलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2020 04:01 PM2020-01-06T16:01:59+5:302020-01-06T16:02:23+5:30

नांदगाव: कमलाबाई कासलीवाल विद्यालयात स्नेहसंमेलनानिमित्त आनंद मेळा साजरा करण्यात आला. राष्ट्रभक्ती, पर्यावरण बचाव, शेतकरी गीत, कॉमेडी उखाणे, नाटिका, थीम डान्स, फनी डान्स लावणी, कोळीनृत्य यांनी ओतप्रोत भरलेल्या सांस्कृतिक कार्यक्र मात विद्यार्र्थ्यांनी कला सादर केली.

  The Nandgaon affair | नांदगावला स्नेहसंमेलन

कासलीवाल विद्यालयाच्या स्नेहसंमेलनात विद्यार्थिनी कला सादर करतांना

googlenewsNext
ठळक मुद्दे कार्यक्र माचे अध्यक्ष महेंद्र भाऊ चांदिवाल होते. संस्थेचे चेअरमन सुनीलकुमार कासलीवाल, सचिव विजय चोपडा, सदस्य रखिबचंद कासलीवाल, प्रशासक प्रकाश गुप्ता, मुख्याध्यापक राजेंद्र खरोटे, मुख्याध्यापक विशाल सावंत, मथ्यू येवले व उपमुख्यध्यापक गोरख डफाळ उपस्थित होत


याप्रसंगी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते तालुका विज्ञान प्रदर्शनात प्रथम क्र मांक प्राप्त केल्या बद्दल सहभागी गार्गी पाटील, दिव्या घोटेकर, मार्गदर्शक शिक्षिका सोनवणे यांचा व राज्यस्तरीय टेबल टेनिस स्पर्धेत सहभागी विद्यालयाचे खेळाडू पियूष पारखे, प्रणव खरोटे,मानसी डफाळ,, कार्तिकी डफाळ, दीपिका सानप, प्राची जेजूरकर व कीक बॉक्सिंग राज्यस्तरीय स्पर्धेत सहभागी जे टी के इंग्लिश मिडीयम ची विद्यार्थीनी अनुष्का सोनवणे यांचा पदक व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन प्रथमेश वाघ, मोक्षदा चव्हाण, राणी बोराळे यांनी केले. आभार संदीप आहेर यांनी व्यक्त केले.

 

 

 

Web Title:   The Nandgaon affair

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.