नांदगाव येथे विवाहितेचा छळ पतीसह सासू, दिराविरूद्ध तक्रार

By Admin | Updated: February 16, 2017 22:51 IST2017-02-16T22:50:46+5:302017-02-16T22:51:00+5:30

नांदगाव येथे विवाहितेचा छळ पतीसह सासू, दिराविरूद्ध तक्रार

Nandgaon affair with husband and husband, complaint against husband | नांदगाव येथे विवाहितेचा छळ पतीसह सासू, दिराविरूद्ध तक्रार

नांदगाव येथे विवाहितेचा छळ पतीसह सासू, दिराविरूद्ध तक्रार


नांदगाव : २५ लाखांचा फ्लॅट घेऊन देण्यासाठी तसेच चारित्र्यावर संशय घेत सासरच्या मंडळींकडून होणाऱ्या मारहाण व त्रासाला कंडाळून येथील अमृता खटके या विवाहितेने पोलीस स्टेशनला तक्रार दिली आहे.
तक्रारीत राहुल खटके (पती), पुष्पा खटके (सासू), प्रशांत खटके (दीर), शीतल बागले (नणंद), सचिन बागले (नंदई) यांची नावे आहेत. प्रथितयश व्यावसायिक प्रकाश गोटे यांची मुलगी अमृता हिचा विवाह १३ मार्च २०११ रोजी राहुल कृष्णा खटके यांच्याशी झाला. लग्नात २० तोळे सोने, संसारोपयोगी वस्तू देऊन थाटामाटात करून देण्यात आला.
लग्नानंतर तिचा छळ सुरू झाला. वडिलांनी वेळोवेळी मध्यस्थांमार्फत सासरच्या मंडळींची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. अमृताला सासरी पोहोचवून दिले. परंतु कुरापती काढून दरवेळी त्यांनी अमृताला त्रास दिला. तिला चार वर्षांची मुलगी आहे. पतीला दारूचे व्यसन आहे. दारू पिऊन तो मारझोड करत असे, असे अमृताने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. महिला दक्षता कक्षाकडे ही सामोपचारासाठी पती पत्नी यांना बोलावण्यात आले होते. परंतु त्याचाही उपयोग झाला नाही. (वार्ताहर)

Web Title: Nandgaon affair with husband and husband, complaint against husband