शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-अमेरिका युद्धाची शक्यता? तेहरानच्या इशाऱ्यानंतर कतारमधील अमेरिकन हवाई तळ केले रिकामे
2
अमेरिकेच्या टॅरिफ धोरणावर आज रात्री फैसला; ट्रम्प यांच्याविरोधात निकाल गेल्यास काय घडू शकतं?
3
हजारीबागमध्ये भीषण बॉम्ब ब्लास्ट, तिघांचा मृत्यू, एकजण गंभीर जखमी
4
मैत्री मैत्रीच्या ठिकाणी...! युद्धात इराणला साथ देणार नाही चीन? कारण काय?
5
धक्कादायक ! नागपुरात बाप झाला सैतान,पत्नीकडे ताबा जाऊ नये म्हणून पोटच्या मुलीची हत्या
6
"JJD हा लालूंचा खरा पक्ष"; राजद विलीनीकरणावर तेजप्रताप यांची तेजस्वींना थेट ऑफर
7
Petrol कार्सच्या तुलनेत Diesel कार्स जास्त मायलेज का देतात? जाणून घ्या यामागील विज्ञान...
8
बांगलादेशचा आडमुठेपणा! भारतात टी-२० वर्ल्डकप खेळण्यास नकार; आता आयसीसीकडे आहेत ३ पर्याय!
9
IND vs NZ : हर्षित राणानं ऑफ स्टंप उडवत डेवॉन कॉन्वेचा केला करेक्ट कार्यक्रम! गंभीरने अशी दिली दाद
10
मुस्लिमबहुल प्रभागांत रंगणार काँग्रेस-एमआयएम सामना! १३ जागांसाठी काँग्रेसची धडपड, शिंदेसेना चारही जागा राखणार?
11
डोंबिवलीत भाजपा अन् शिंदेसेनेत जोरदार राडा; ५ जणांना अटक, जखमींवर रुग्णालयात उपचार
12
Video - ई-रिक्षातील तरुणाचं अश्लील कृत्य; रणरागिणीने रस्त्यावरच घडवली चांगलीच अद्दल
13
"विना परवाना शस्त्र वाटणार, ज्याला हवं त्याने..."; योगी सरकारच्या मंत्र्याचं धक्कादायक विधान
14
भारतीय पासपोर्टला मिळाली ताकद, आता ५५ देशांमध्ये व्हिसा-मुक्त प्रवेशाची परवानगी
15
‘तातडीने इराण सोडा, मिळेल त्या वाहनाने बाहेर पडा’, भारतीय दूतावासाकडून आपल्या नागरिकांना सूचना
16
रॉकेट बनलाय हा पेनी स्टॉक, ५ दिवसांत दिला ६१% परतावा; फक्त २० रुपयांवर भाव! तुमच्याकडे आहे का?
17
भारतातील एक अनोखे मंदिर; जाणून घ्या ९९ लाख ९९ हजार ९९९ दगडी मूर्तींचे रहस्य...
18
"त्यांच्या शेवटाची वाट पाहत होता, हे स्वप्न नाही तर नमकहरामी"; अश्विनी जगतापांच्या स्टेटसने संघर्ष चव्हाट्यावर
19
Bala Nandgaonkar : "रात्र वैऱ्याची आहे, यावेळी मराठी माणूस चुकला तर..."; ठाकरेंच्या निष्ठावंताची भावुक पोस्ट
20
चोर असावा तर असा! आधी देवीची माफी मागितली, मग दागिने केले लंपास; Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

नांदगावी रसायनशास्त्र परिषद

By admin | Updated: January 22, 2016 22:54 IST

नांदगावी रसायनशास्त्र परिषद

नांदगाव : रसायनशास्त्र हा आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक आहे. विज्ञानामुळे क्र ांती झाली असून, त्यात रसायनशास्त्राचा मोठा वाटा असल्याचे प्रतिपादन मराठवाडा विद्यापीठातील रसायनशास्त्राचे प्राध्यापक व संशोधक डॉक्टर बापू शिंगाटे यांनी केले. येथील मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात आजपासून दोनदिवसीय रसायनशास्त्रविषयक राज्यस्तरीय परिषदेला प्रारंभ झाला, त्यावेळी झालेल्या पहिल्या सत्राच्या उद्घाटनपर कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून प्रा. शिंगाटे बोलत होते. केंद्रीय अनुदान आयोग, सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने या चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर पी. आर. भाबड अध्यक्षस्थानी होते. व्यासपीठावर प्रा. एम. आर. गवारे, डॉ. पावन तांबडे, संजीव निकम, प्रा. बी. एन. शेळके यावेळी उपस्थित होते.‘रसायनशास्त्रातील संधी व आव्हाने’ या विषयावर प्रा. डॉ. शिंगाटे यांनी मौलिक मार्गदर्शन केले. वेगवेगळ्या विद्यापीठातील संशोधनातील संधी व आर्गोनिक सिन्थेसिस , नेचरल प्रोडक्ट आणि ड्रग्स आदिबाबत डॉ. शिंगटे यांनी आपले विचार मांडले. नाशिकच्या के. टी. एच. एम. कॉलेजचे रसायनशास्त्र विभागाचे प्रा. डॉ. एस. व्ही. पाटील व डॉ. जे. एस. अहेर यांनी संशोधनातील संधी व टप्पे समजावून सांगताना शिक्षक व विद्यार्थ्यांनी संशोधनाकडे वळावे, अशी अशी अपेक्षा व्यक्त केली. व्ही. व्ही. खन्ना यांनी ड्रग डिस्कव्हरी अ‍ॅँड डेव्हलपमेंटबद्दल सखोल मार्गदर्शन केले. मानवी जीवन व रसायनशास्त्र यांच्या परस्पर संबंधाचा आढावा प्राचार्य डॉ. भाबड यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतात घेतला. चर्चासत्राचे समन्वयक डॉक्टर पी. जे. तांबडे यांनी प्रास्ताविक केले पुणे, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा विद्यापीठांतील प्राध्यापक या परिषदेत सहभागी झाले असून, उद्या परिषदेचा समारोप होणार आहे. प्रा. पी. पी. जमदाडे, श्रीमती पी. एन. जाधव, श्रीमती पी. एन. ठाकरे, प्रा. एल. डी. देढे, भूषण पाटील यांनी संयोजन केले. प्रा. बी. एन. शेळके यांनी सूत्रसंचालन केले, तर प्रा. गवारे यांनी आभार मानले. (वार्ताहर)