नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने शहरात स्वच्छता मोहीम (फोटो कॅप्शन)

By Admin | Updated: May 11, 2014 19:41 IST2014-05-11T19:34:32+5:302014-05-11T19:41:43+5:30

नाशिक : नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने शहरात ठिकठिकाणी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. प्रतिष्ठानच्या सेवेकर्‍यांनी मुंबई नाका ते पाथर्डी फाटा दरम्यान उड्डाणपुलालगत असलेल्या उद्यानातील साचलेला केरकचरा गोळा केला. केवळ सेवाभावी वृत्तीने आणि कुठल्याही प्रसिद्धीशिवाय राबविण्यात आलेल्या सदर मोहिमेदरम्यान कोणतीच फलकबाजी करण्यात आली नव्हती. सेवेकरी स्वयंशिस्तीने केरकचरा, पालापाचोळा वेचताना दिसत होते. अवघ्या काळी वेळातच सेवेकर्‍यांनी उड्डाणपुलालगतचे उद्यान स्वच्छ करून टाकले. यामध्ये पुरुषांबरोबरच महिला सेवेकरीही मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.

Nanasaheb Dharmadhikari Pratishthan has organized a clean campaign in the city (photo caption) | नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने शहरात स्वच्छता मोहीम (फोटो कॅप्शन)

नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने शहरात स्वच्छता मोहीम (फोटो कॅप्शन)

नाशिक : नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने शहरात ठिकठिकाणी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. प्रतिष्ठानच्या सेवेकर्‍यांनी मुंबई नाका ते पाथर्डी फाटा दरम्यान उड्डाणपुलालगत असलेल्या उद्यानातील साचलेला केरकचरा गोळा केला. केवळ सेवाभावी वृत्तीने आणि कुठल्याही प्रसिद्धीशिवाय राबविण्यात आलेल्या सदर मोहिमेदरम्यान कोणतीच फलकबाजी करण्यात आली नव्हती. सेवेकरी स्वयंशिस्तीने केरकचरा, पालापाचोळा वेचताना दिसत होते. अवघ्या काळी वेळातच सेवेकर्‍यांनी उड्डाणपुलालगतचे उद्यान स्वच्छ करून टाकले. यामध्ये पुरुषांबरोबरच महिला सेवेकरीही मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.
(फोटो आहे)

Web Title: Nanasaheb Dharmadhikari Pratishthan has organized a clean campaign in the city (photo caption)

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.