नामपूृर जि.प. शाळेला कुलूप; शिक्षकाच्या बदलीची मागणी

By Admin | Updated: September 28, 2015 23:50 IST2015-09-28T23:49:32+5:302015-09-28T23:50:37+5:30

नामपूृर जि.प. शाळेला कुलूप; शिक्षकाच्या बदलीची मागणी

Namrupar ZP School lock Teacher's replacement demand | नामपूृर जि.प. शाळेला कुलूप; शिक्षकाच्या बदलीची मागणी

नामपूृर जि.प. शाळेला कुलूप; शिक्षकाच्या बदलीची मागणी

नामपूर : येथील जिल्हा परिषदेच्या इंदिरानगर क्लास शाळेतील शिक्षकाची बदली व्हावी या मागणीसाठी सरपंच प्रमोद सावंत, शालेय समितीचे अशोक सावंत व पालकांनी कुलूप ठोकले. सदर शिक्षकाची बदली होत नाही तोपर्यंत शाळा बंद राहील, असा इशारा बागलाणचे गटशिक्षणाधिकारी बी. टी. पाटील यांना उपस्थितांनी दिला.
पंडित शंकर कापडणीस हे अंबासन शाळेतून या शाळेत वर्षापूर्वी बदली होऊन आलेले शिक्षक आहेत. अंबासन शाळेतूनही त्यांना शाळेला कुलूप लावूनच काढले होते. या शाळेत वारंवार रजा टाकणे, विद्यार्थ्यांना मारहाण करणे, पालकांशी अरेरावीने वागणे, प्रशासनात अडथळे आणणे अशा विविध तक्रारी त्यांच्याबाबत यापूर्वीच तालुक्याच्या गटशिक्षणाधिकाऱ्यांना प्रत्यक्ष भेटून व लेखी निवेदनाद्वारे पालक-शिक्षक समितीच्या एका शिष्टमंडळाने केली होती. मात्र ग. शि. पाटील यांनी या निवेदनाला केराची टोपली दाखवली. मात्र ५०० पालक नामपूरचे सरपंच प्रमोद सावंत, जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण सभापती अशोक सावंत, ग्रामपंचायत सदस्य अशोक पवार, पोपट रामचंद्र शिंदे, विजय हिरालाल साळवे, राजेंद्र दाभाडे, रमेश येशी, सुरेश पवार, राजेंद्र पवार यांनी उपस्थित पालकातून भूमिका विशद केली.
रवींद्र राजेंद्र पवार यांच्या कानावर मारल्याने त्याला आॅपरेशनला सामोरे जावे लागले. तुषार ज्ञानेश्वर पवार यास प्रचंड मारहाण केली. या विद्यार्थ्यांच्या पालकांनीही या शिक्षकाच्या विरोधात भूमिका मांडली आज दिवसभर शाळा झाडाखाली भरली. (वार्ताहर)
 

Web Title: Namrupar ZP School lock Teacher's replacement demand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.