ऑक्सिजनअभावी नामपूरचे रुग्णालय होईना सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 04:16 IST2021-04-23T04:16:10+5:302021-04-23T04:16:10+5:30
बागलाण तालुक्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजवला आहे . दुसऱ्या लाटेची चाहूल फेब्रुवारी महिन्यातच लागली असताना प्रशासन याबाबत ...

ऑक्सिजनअभावी नामपूरचे रुग्णालय होईना सुरू
बागलाण तालुक्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजवला आहे . दुसऱ्या लाटेची चाहूल फेब्रुवारी महिन्यातच लागली असताना प्रशासन याबाबत बेफिकीर असल्याचा प्रत्यय आजच्या अपुऱ्या आरोग्य सुविधांवरून येतो. मार्च महिन्याच्या मध्यापासून तालुक्यात दररोज सरासरी ११० ते १२० रुग्ण आढळत होते . अशा भयावह परिस्थितीतदेखील प्रशासनाला जाग आली नाही. आता परिस्थिती हाताबाहेर जावून तालुक्यातील तब्बल दीडशेहून अधिक गावांमध्ये कोरोनाचा शिरकाव होऊन दररोज सरासरी ५ ते ६ रुग्णांचा बळी जात आहे. बहुतांश रुग्णांचा ऑक्सिजनअभावी मृत्यू झाल्याचे वैद्यकीय सूत्रांनी संगितले.
अपुऱ्या आरोग्य सुविधांमुळे रुग्णांची आजही हेळसांड होताना दिसत आहे. ऑक्सिजन बेड नसल्यामुळे मृत्यूचे प्रमाणही वाढले आहे. त्याचा दाखला देत आमदार दिलीप बोरसे यांनी मोसम परिसरसाठी नामपूर ग्रामीण रुग्णालयात ३० ऑक्सिजन बेडचे कोविड रुग्णालय व सटाणा शहरासाठी स्वतंत्र ६० ऑक्सिजन बेडचे कोविड रुग्णालय सुरू करण्याची मागणी केली होती. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी नामपूर येथे ३० बेडचे कोविड रुग्णालय सुरू करण्यास मान्यता दिली. बेड आणि ऑक्सिजन पाईपलाईनही तयार झाली. मात्र, तीन आठवडे उलटूनही ऑक्सिजनअभावी आजही रुग्णालय धूळखात पडून आहे. शासनाच्या या उदासीन धोरणांमुळे मात्र रुग्णांना आपला जीव गमवावा लागत आहे. येत्या चार दिवसांत प्रशासनाने रुग्णालय सुरू न केल्यास मृत्यूदर वाढण्याची भीती जाणकारांकडून व्यक्त केली जात आहे.
इन्फो
सटाणा शहरात दोन खासगी कोविड सेंटरला मान्यता देण्यात आली आहे. मात्र, येथे देखील ऑक्सिजन आणि रेमडेसिवीर इंजेक्शनच्या तुटवड्याचा सामना करावा लागत आहे. बागलाणमध्ये नामपूर, जायखेडा, ताहाराबाद, सोमपूर, पिंपळकोठे, ब्राह्मणगाव, लखमापूर ही गावे कोरोनाची ‘हॉटस्पॉट’ ठरली आहेत. रुग्णांची हेळसांड थांबविण्यासाठी गावपातळीवर स्थानिक डॉक्टरांच्या मदतीने कोविड उपचार केंद्र व विलगीकरण कक्ष सुरू करून कोरोना आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केला जात आहे.
इन्फो
हॉटस्पॉट गावे
बागलाणमध्ये नामपूर, जायखेडा, ताहाराबाद, सोमपूर, पिंपळकोठे, ब्राह्मणगाव, लखमापूर ही गावे कोरोनाची ‘हॉट स्पॉट’ ठरली आहेत. येथे कोरोनाची साखळी तोडण्यासाठी शंभर टक्के बंद ठेऊन जनता कर्फ्यू लागू केला आहे. त्यामुळे रुग्णसंख्येत घट होत असल्याचा दावा ग्रामपंचायत प्रशासनाने केला आहे. तसेच येथे कोरोनाची साखळी तोडण्यासाठी शंभर टक्के बंद ठेऊन जनता कर्फ्यू लागू केला आहे. त्यामुळे रुग्णसंख्येत घट होत असल्याचा दावा ग्रामपंचायत प्रशासनाने केला आहे .
फोटो - २२ सटाणा कोरोना
===Photopath===
220421\22nsk_25_22042021_13.jpg
===Caption===
फोटो - २२ सटाणा कोरोना