नावे वगळलेल्या मतदारांची यादी नगरसेवकांकडे
By Admin | Updated: November 3, 2015 00:01 IST2015-11-03T00:01:36+5:302015-11-03T00:01:56+5:30
नावे नोंदणीची संधी : ७ नोव्हेंबर अंतिम मुदत

नावे वगळलेल्या मतदारांची यादी नगरसेवकांकडे
नाशिक : मतदार पुनरीक्षण मोहिमेंतर्गत घराच्या पत्त्यावर न आढळून आलेले, तसेच यादीत छायाचित्र नसलेल्या मतदारांची नावे वगळण्यात आल्यानंतर यादीतून बाद झालेल्या मतदारांची नावे सर्वच राजकीय पक्ष व नगरसेवकांकडे सोपविण्यात आली असून, त्याचा आधार घेऊन नगरसेवकांना पुन्हा नवीन मतदार नोंदविण्याची संधी उपलब्ध झाली आहे.
गेल्या महिन्यात राबविण्यात आलेल्या या मोहिमेत नाशिक पश्चिम व नाशिक पूर्व या दोन मतदारसंघात अनुक्रमे ३८ व ३४ हजार मतदारांचा थांगपत्ता लागलेला नाही. केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांनी (बीएलओ) घरोघरी जाऊन केलेल्या पाहणीत अनेक मतदार दिलेल्या पत्त्यावर सापडले नाहीत, त्याचबरोबर एकाच मतदाराची दनावे वगळलेल्या मतदारांची यादी नगरसेवकांकडेनावे नोंदणीची संधी : ७ नोव्हेंबर अंतिम मुदतोन ते तीन ठिकाणी नावे असल्याचेही आढळून आले. काही मतदार मयत झालेले असतानाही त्यांची नावे यादीतच असल्याने अशांचे मृत्यूचे प्रमाणपत्र घेण्यात येऊन त्यांची नावे वगळण्यात आली, तर एकापेक्षा अधिक ठिकाणी नावे असलेल्या मतदाराच्या इच्छेनुसार एकाच ठिकाणी नाव कायम ठेवून अन्य ठिकाणची नावे वगळण्यात आली आहेत.
यादीतून मतदारांची नावे वगळण्याची बाब राजकीयदृष्ट्या संवेदनशील मानली गेली असून, सध्या मतदार यादीत नाव असलेल्या मतदारांनाच २०१७ मध्ये होणाऱ्या जिल्हा परिषद व महापालिका निवडणुकीत मतदान करता येणार आहे. त्यामुळे निवडणूक अधिकाऱ्यांनी यादीतून नाव वगळलेल्या मतदारांच्या नावांची सीडीच महापालिकेच्या नगररचना विभागामार्फत प्रत्येक नगरसेवकाला उपलब्ध करून दिली आहे. त्याचबरोबर मतदान केंद्रांवरही मतदारांना नावे पाहण्यासाठी जाहीर करण्यात आली आहेत.
नगरसेवकांना आपल्या प्रभागातील मतदारांची नावे शोधून ज्यांची नावे वगळली गेली असतील त्यांना नव्याने नाव नोंदणीसाठी संधी उपलब्ध करून देण्यात येणार असून, ७ नोव्हेंबरपर्यंत आवश्यक त्या कागदपत्रांसह अर्ज केल्यास मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यात येणार असल्याची माहिती सहायक निवडणूक निर्णय अधिकारी डी. आर. लचके यांनी दिली आहे. (प्रतिनिधी)