शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकमत इम्पॅक्ट: गणेश मंडळांना मोठा दिलासा, मंडपासाठीच्या खड्ड्यांचा दंड १५ हजारावरुन २ हजारावर  
2
'एक दिवस पाकिस्तान भारताला तेल विकेल'; अमेरिकेचा पाकिस्तानसोबत करार, डोनाल्ड ट्रम्प काय म्हणाले?
3
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात सर्व आरोपी निर्दोष सुटल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया, म्हणाले...
4
बाईकचा चेसिस नंबर सापडलाच नाही! प्रज्ञा सिंह ठाकूर मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातून कशा सुटल्या?
5
सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण, १० ग्रॅमसाठी किती खर्च करावे लागणार; पाहा नवे दर
6
मला माझे ९०० रुपये परत हवेत; मालेगाव बॉम्बस्फोटात निर्दोष सुटलेल्या समीर कुलकर्णींची मागणी 
7
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण निकाल: सर्व सात आरोपींची निर्दोष मुक्तता, कुणावर होते काय आरोप?
8
Upcoming Smartphones: विवो, रेडमीपासून ते गूगल पिक्सेलपर्यंत; ऑगस्टमध्ये पडणार स्मार्टफोनचा पाऊस!
9
पाकिस्तानी बॉर्डरजवळ विखुरलेल्या बांगड्यांचं सत्य काय?; भारताने शोधून काढलं दडलेलं रहस्य
10
मालेगाव बॉम्बस्फोटाच्या निर्णयावर ओवेसी नाराज, मोदी सरकारवर केले गंभीर आरोप...
11
शिक्षण महागलं! "ABCD शिकवण्याचे २.५ लाख द्यायचे?"; लेकीची नर्सरीची फी पाहून आई शॉक
12
सावधान! AI मुळे 'या' नोकऱ्या धोक्यात? मायक्रोसॉफ्टच्या अभ्यासात धक्कादायक खुलासा, तुमची नोकरी सुरक्षित आहे का?
13
ट्रम्प यांचा भारतावरील टॅरिफ बॉम्ब अमेरिकन लोकांवरच उलटणार? औषधांच्या किंमती वाढण्याचा धोका
14
"राजकीय बदनामीच्या षड्यंत्राचा पर्दाफाश, काँग्रेसने हिंदूंची माफी मागावी", भाजपाचा हल्लाबोल
15
"हिंदू दहशतवादी नाही, शाहांचं विधान अन् आज कोर्टात आरोपींची निर्दोष सुटका हा फक्त योगायोग"
16
१७ वर्षांनी आरोपी निर्दोष सुटले, मग दोषी कुठे आहेत?; मालेगाव स्फोट खटल्याच्या निकालानंतर प्रश्नचिन्ह
17
धक्कादायक! ८ वर्षांच्या चिमुकल्याच्या गुप्तांगावर शिक्षिकेनं फवारलं कॉलीन; नालासोपाऱ्याच्या शाळेला टाळं
18
लॉर्ड्स मैदानावर खेळला शाहिद कपूर, इंग्लंडच्या माजी खेळाडूंसोबत शेअर केले Photo
19
Malegaon Blast Case Verdict : मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातून निर्दोष सुटताच प्रज्ञा सिंह भावूक, अश्रू अनावर, म्हणाल्या - 'भगवा जिंकला...'
20
मालेगाव बॉम्बस्फोट; कधी अन् कसा झाला? किती लोक मृत्यूमुखी पडले? जाणून घ्या पूर्ण टाईमलाईन

थकबाकीदारांच्या मिळकती मनपाच्या नावावर करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2018 00:50 IST

महापालिकेच्या घरपट्टी थकबाकी पोटी जप्त करण्यात आलेल्या मिळकतींची लिलावप्रक्रिया केली जाते, मात्र बोली लावण्यास कोणी येत नाही. अशा मिळकतींची वसुलीप्रक्रिया अर्धवट राहत असल्याने आता या मिळकतींवर एक रुपयांच्या नाममात्र मोबदल्यात महापालिकेचे नाव लावले जाणार आहेत.

नाशिक : महापालिकेच्या घरपट्टी थकबाकी पोटी जप्त करण्यात आलेल्या मिळकतींची लिलावप्रक्रिया केली जाते, मात्र बोली लावण्यास कोणी येत नाही. अशा मिळकतींची वसुलीप्रक्रिया अर्धवट राहत असल्याने आता या मिळकतींवर एक रुपयांच्या नाममात्र मोबदल्यात महापालिकेचे नाव लावले जाणार आहेत.  यासंदर्भात येत्या शुक्रवारी (दि.२४) स्थायी समितीच्या बैठकीत यासंदर्भात प्रस्ताव अहवाल सादर केला जाणार आहे. विशेष म्हणजे स्थायी समितीच्या बैठकीच्या दिवशी १२० मिळकतींचा थकबाकीसाठी लिलाव होणार असून, त्यांना बोली न लावल्यास त्यादेखील महापालिकेच्या नावावर लागणार आहे.  महापालिकेच्या वतीने कोट्यवधी रुपयांच्या थकबाकी वसुलीसाठी मिळकती जप्त करण्याची कार्यवाही करण्यात येते मात्र, त्याच्या वसुलीसाठी नंतर बोली लावल्यानंतरदेखील नागरिक येत नाहीत. नाशिक शहरात काही थकबाकीदार बहुचर्चित असून, त्यातील काही विलफुल डिफॉल्टर म्हणून परिचित असल्याने त्यांच्या मिळकती लिलावात विकत घेण्याच्या भानगडीत कोणी पडत नाही. त्यामुळे महापालिकेचे प्रयत्न वाया जातात. त्यावर मात करण्यासाठी महापालिकेने नवीन युक्ती शोधली आहे. त्यानुसार ज्या मिळकतींचे लिलाव काढूनही कोणी खरेदीदार पुढे येणार नाहीत आणि मिळकतधारकही पुढे येणार नाहीत तीच मिळकत आता महापालिका एक रुपये नाममात्र दराने खरेदी करून त्यावर महापालिकेचे नाव लावले जाणार आहे. यामुळे मिळकदार अडचणीत येण्याची शक्यता आहे.शुक्रवारी १२० मिळकतींचे लिलावमहापालिकेच्या वतीने येत्या शुक्रवारी (दि.२४) सहा विभागांतील १२० मिळकतींचे लिलाव केले जाणार आहेत. चार कोटी १३ लाख रुपयांच्या थकबाकी वसुलीसाठी हे लिलाव केले जाणार असले तरी याच मिळकतींचे हे तिसऱ्यांदा लिलाव होत असून, त्यामुळे प्रतिसाद मिळण्याची शक्यता कमी आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिका