साठे यांच्या नावाने वाचनालय सुरू
By Admin | Updated: October 10, 2015 23:38 IST2015-10-10T23:37:50+5:302015-10-10T23:38:47+5:30
साठे यांच्या नावाने वाचनालय सुरू

साठे यांच्या नावाने वाचनालय सुरू
येवला : येथील दत्तनगर परिसरात खुल्या जागेत लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या नावाने वाचनालय सुरु झाले आहे. या वाचनालयाचे उद्घाटन आमदार छगन भुजबळ यांनी केले. परिसर व वाचनालय सुशोभिकरण करण्याचे आश्वासन छगन भुजबळ यांनी दिले होते. परंतु सुशोभिकरण तर दूरच; पण या रस्त्यावर इतके खड्डे झाले की रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे वाचनालयात येणाऱ्या नागरिकांना ये-जा करण्यास त्रास होत आहे. सुशोभिकरण व रस्ता लवकर व्हावा, अशी अपेक्षा परिसरातून होत आहे.
येवला : कुक्कर गल्ली ते पटेल मशीद या परिसरात नगरपालिकेच्या पाणीपुरवठा योजनेतून अत्यंत कमी दाबाने पाणीपुरवठा होतो. परिणामी नागरिकांना पुरेसे पाणी मिळत नाही. नगरपालिकेने या कडे लक्ष देण्याची गरज आहे. कारण नागरिकांना पाच दिवसआड पाणीपुरवठा होत असून सहाव्या दिवशी आलेल्या कमी दाबाच्या पाण्याने नागरिकांना पाणी मिळत नसून पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.