विजयनगर चौकास महात्मा बसवेश्वरांचे नाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2018 00:06 IST2018-04-27T00:06:10+5:302018-04-27T00:06:10+5:30
सिन्नर : शहरातील विजयनगर उपनगर चौकाचा ‘महात्मा बसवेश्वर चौक’ नामकरण सोहळा उत्साहात पार पडला.

विजयनगर चौकास महात्मा बसवेश्वरांचे नाव
सिन्नर : शहरातील विजयनगर उपनगर चौकाचा ‘महात्मा बसवेश्वर चौक’ नामकरण सोहळा उत्साहात पार पडला. नगरसेवक संतोष शिंदे यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात महात्मा बसवेश्वर जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. शिवा संघटनेचे अध्यक्ष डॉ. श्यामसुंदर झळके यांनी महात्मा बसवेश्वरांच्या सामाजिक कार्याची माहिती दिली. यावेळी संतोष वाळेकर, सुनील लोहारकर, गणेश अंकद, हर्षद लोहारकर, किरण होनराव, कुणाल झळके, भास्कर गिते यांच्यासह नागरिक उपस्थित होते.