प्रेरणा संस्थेची नाम फाउंडेशनला मदत
By Admin | Updated: December 2, 2015 22:41 IST2015-12-02T22:40:23+5:302015-12-02T22:41:29+5:30
प्रेरणा संस्थेची नाम फाउंडेशनला मदत

प्रेरणा संस्थेची नाम फाउंडेशनला मदत
नाशिक : प्रेरणा एकता बहुद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने आत्महत्त्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक सहाय्य करण्यासाठी नाम फाउंडेशनला ५१ हजार रुपयांचा धनादेश सिनेअभिनेते मकरंद अनासपुरे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.
प्रेरणा एकता बहुद्देशीय सामाजिक संस्था ही विविध सामाजिक, तसेच स्पर्धा परीक्षाविषयक कार्य करणारी संस्था आहे. राज्यात दुष्काळीस्थिती लक्षात घेऊन संस्थेने नुकत्याच झालेल्या वार्षिक स्नेहसंमेलनात शेतकऱ्यांना मदतीचा निर्णय घेतला होता. त्यानुसार ५१ हजार रुपये जमा करत त्याचा धनादेश नाम फाउंडेशनला सुपूर्द करण्यात आला.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष कैलास दराडे, विष्णू वारुंगसे, गोविंद बोराडे, किरण लोंढे, संदीप बागुल, भगवान काकड, निखिल रोकडे, बाळासाहेब पगारे, प्रमोद आव्हाड, राजेंद्र सानप, अमित आडके, राजेंद्र पाचोरकर आदिंसह सदस्य उपस्थित होते. दरम्यान, शहरातील विविध अभ्यासिकेतील गरजू विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षाविषयक पुस्तके उपलब्ध करून दिली जाणार असल्याचे कैलास दराडे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)