शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

दुबईच्या नावाखाली तोतया नाटककाराने दोन लाखांना गंडविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2018 00:50 IST

मुलांना नाटक शिकविण्याच्या बहाण्याने तसेच नाटकाच्या प्रयोगासाठी दुबईला नेणार असल्याचे सांगत तोतया नाटककाराने पालकांकडून दोन लाख रुपये घेऊन फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे़

नाशिक : मुलांना नाटक शिकविण्याच्या बहाण्याने तसेच नाटकाच्या प्रयोगासाठी दुबईला नेणार असल्याचे सांगत तोतया नाटककाराने पालकांकडून दोन लाख रुपये घेऊन फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे़ या प्रकरणी गंगापूर पोलिसांनी संशयित तोतया नाटककार प्रशांत दामोदर वाघ (२९, खरबंदा पार्क, द्वारका) याच्या विरोधात गुन्हा दाखल करून अटक केली आहे़  गंगापूररोड परिसरातील रहिवासी पृथ्वीराज विसपुते यांनी गंगापूर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार संशयित प्रशांत वाघ याने नाटककार असल्याची बतावणी करून विश्वास संपादन केला. मुलांना नाटक शिकवतो, असे सांगितल्याने त्याच्यावर विश्वास ठेवून मुलांना नाटक शिकण्यासाठी पाठविले. यानंतर वाघ याने परशुराम साईखेडकर नाट्यगृह व कालिदास कलामंदिर येथे मुलांच्या नाटकाची प्रॅक्टिस घेण्याचा देखावा केला.  यानंतर वाघ याने १६ नोव्हेंबर २०१६ ते १५ मे २०१८ या कालावधीत मुलांना नाटकाच्या कार्यक्रमासाठी दुबईला घेऊन जाणार असल्याचे सांगून मुलांच्या पालकांकडून २ लाख १ हजार रुपये उकळले. त्यामध्ये विसपुते यांच्याकडून ५० हजार रुपये, गौरी कुलकर्णी यांच्याकडून बारा हजार रुपये, तृप्ती तांबे यांच्याकडून ५४ हजार रुपये, समीर जोशी यांच्याकडून बारा हजार रुपये, महेश देशपांडे यांच्याकडून बारा हजार रुपये, गीतांजली भालेराव यांच्याकडून बारा हजार रुपये, उन्मेष कुमठेकर यांच्याकडून ३७ हजार रुपये, शीतल शिंदे यांच्याकडून बारा हजार रुपये असे दोन लाख रुपये घेऊन मुलांना दुबईला घेऊन न जाता पैशांचा अपहार करून फसवणूक केली.या फसवूक प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात गत दोन-तीन महिन्यांपासून तक्रारी करण्यात येत होत्या़ त्यानुसार संशयित वाघ यास पोलीस ठाण्यातही बोलाविण्यात आले, मात्र त्याने नकार दिला होता़ अखेर पृथ्वीराज विसपुते यांनी फिर्याद दिल्यानंतर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली़

टॅग्स :PoliceपोलिसCrimeगुन्हा