जॉगिंग ट्रॅकवर ओल्या पार्ट्या

By Admin | Updated: March 27, 2016 22:39 IST2016-03-27T22:37:02+5:302016-03-27T22:39:50+5:30

पोलीस गस्तीची मागणी : पथदीपांच्या नुकसानीमुळे अंधार

The naked parties on the jogging track | जॉगिंग ट्रॅकवर ओल्या पार्ट्या

जॉगिंग ट्रॅकवर ओल्या पार्ट्या

 वडाळागाव : डीजीपीनगर-वडाळा कॅनॉल रोडलगत असलेल्या वडाळा-डीजीपीनगर जॉगिंग ट्रॅकवर रात्रीच्या वेळी अंधाराचे साम्राज्य असते. त्यामुळे या ट्रॅकवर रात्रीच्या सुमारास मद्यपींच्या ओल्या पार्ट्यांसह पत्त्यांचे डाव कुटले जात असल्याची तक्रार परिसरातील रहिवाशांनी केली आहे.
गॅस गुदामापासून नाल्यापर्यंतच्या ट्रॅकवर मद्यपी व जुगाऱ्यांनी अड्डा बनविला आहे. ट्रॅकवरील सर्व पथदीपांचे टवाळखोरांनी नुकसान केल्याने रात्रीच्या सुमारास या ठिकाणी अंधार पसरतो. अंधाराचा फायदा घेत रिक्षा, दुचाकी तसेच चारचाकींमधून मद्यपी या ठिकाणी येतात व ओल्या पार्ट्या करतात, असे नागरिकांचे म्हणणे आहे. त्याचप्रमाणे गेल्या काही दिवसांपासून वाहनांमधून रात्रीच्या वेळी प्रेमीयुगुलांचे येण्याचे प्रमाणही वाढले असल्याचे नागरिका सांगतात. रात्रीच्या सुमारास कॅनॉलरोडवर वाहतूक कमी असते तसेच ट्रॅकच्या दुसऱ्या बाजूने मोकळा भूखंड व तोफखाना केंद्राचा परिसर असल्यामुळे रहिवाशांची वस्तीदेखील नसल्याने प्रेमीयुगुलांचे सदर ट्रॅक पसंतीचे ठिकाण बनत चालले आहे. मद्यपींच्या चालणाऱ्या ओल्या पार्ट्यांमुळे या ठिकाणी प्रेमीयुगुल व मद्यपींमध्ये वाद-विवादाचे प्रसंग उद्भवून हाणामाऱ्या होण्याची शक्यतादेखील नाकारता येत नाही, असे जागरूक नागरिकांचे म्हणणे आहे. मद्याची झिंग चढल्यानंतर प्रेमीयुगुलांसोबत मद्यपी जाणूनबुजून वाद घालण्याचा प्रयत्न होऊ शकतो आणि यामधूनच वाद-विवादाच्या घटना घडण्याचा धोका नाकारता येत नाही. पखालरोडवरच गस्त न घालता या ट्रॅकवरही गस्त घालून मद्यपींवर कारवाई करण्याची मागणी होत आहे. (वार्ताहर)

Web Title: The naked parties on the jogging track

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.