नैताळे, कळवण प्रथम
By Admin | Updated: March 31, 2016 00:13 IST2016-03-31T00:09:44+5:302016-03-31T00:13:54+5:30
आनंदीबाई जोशी पुरस्कार वितरण

नैताळे, कळवण प्रथम
नाशिक : जिल्हा परिषद व आरोग्य उपसंचालक यांच्या संयुक्त विद्यमाने दिल्या जाणाऱ्या आनंदीबाई जोशी व आशा गट प्रवर्तक पुरस्कारांचे बुधवारी (दि. ३०) जिल्हा परिषदेच्या रावसाहेब थोरात सभागृहात वितरण करण्यात आले. प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये नैताळे, खामखेडा व शिंदे यांना अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय पुरस्काराने गौरविण्यात आले. तसेच कळवण ग्रामीण रुग्णालयास जिल्ह्यातून प्रथम क्रमांकाने गौरविण्यात आले.
आनंदीबाई जोशी पुरस्कार प्राप्त आरोग्य केंद्र, उपकेंद्र, ग्रामीण रुग्णालय तसेच गट प्रवर्तक व आशा कर्मचाऱ्यांची नावे पुढीलप्रमाणे- प्राथमिक आरोग्य केंद्र- नैताळे (प्रथम), खामखेडा (द्वितीय), श्ािंंदे(तृतीय), आरोग्य उपकेंद्र- दरी (प्रथम), विठेवाडी (द्वितीय), देसगाव (तृतीय), ग्रामीण रुग्णालय- कळवण (प्रथम) त्याप्रमाणे गाव पातळीवर काम करणाऱ्या आशा व गट प्रर्वतक कमचाऱ्यांची नावे पुढीलप्रमाणे- रंजना रमेश गांगुर्डे (प्रथम-तळेगाव दिंडोरी), सीता मधुकर जाधव (द्वितीय-कोहोर), आरोग्य सखी पुरस्कार- सुषमा पुरुषोत्तम सदावर्ते (प्रथम- चांदोरी, निफाड), हिरा यशवंत झुगरे (द्वितीय- नांदगाव सदो, इगतपुरी), (पान १० वर)
गट प्रवर्तक पुरस्कार- वैशाली दगडू धामणे (प्रथम- मोकभणगी-कळवण), संगीता गणेश भोये (द्वितीय- ठाणापाडा-त्र्यंबकेश्वर), सीता रामा अहिरे (तृतीय- केळझर-बागलाण) यासह तालुकास्तरीय पुरस्कारासाठी प्रत्येक तालुक्यातून दोन पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. पुरस्कार वितरण सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी आरोग्य उपसंचालक डॉ. सुनील पाटील होते. पुरस्कारांचे वितरण अध्यक्ष विजयश्री चुंभळे, शिक्षण व आरोग्य सभापती किरण पंढरीनाथ थोरे, मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद शंभरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुशील वाकचौरे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुनील जगदाळे, माता व बाल संगोपन अधिकारी डॉ. रवींद्र चौधरी, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दावल साळवे आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)