नाईक संस्था निवडणूक : ४४३ उमेदवारांचे अर्ज वैध

By Admin | Updated: July 5, 2014 00:23 IST2014-07-05T00:11:16+5:302014-07-05T00:23:01+5:30

नाईक संस्था निवडणूक : ४४३ उमेदवारांचे अर्ज वैध

Naik Institute Election: 443 candidates' application valid | नाईक संस्था निवडणूक : ४४३ उमेदवारांचे अर्ज वैध

नाईक संस्था निवडणूक : ४४३ उमेदवारांचे अर्ज वैध

नाशिक : क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीत २९ जागांसाठी ४४३ उमेदवारांचे अर्ज छाननी प्रक्रियेत वैध ठरविण्यात आल्याची माहिती निवडणूक अधिकारी अ‍ॅड. जालिंदर ताडगे यांनी दिली. मंगळवार, दि. ८ जुलैपर्यंत अर्ज माघारीची मुदत असून, त्यानंतर निवडणुकीचे चित्र स्पष्ट होईल.
निवडणुकीत २९ जागांसाठी ४८६ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. आज छाननी प्रक्रियेत ४३ अर्ज तांत्रिक कारणास्तव अवैध ठरविण्यात आले. आता अध्यक्षपदासाठी २७, उपाध्यक्ष- २७, सरचिटणीस- १७, सहचिटणीस- ३७, महिला- २०, विश्वस्त- १००, नाशिक- ४६, सिन्नर- ५४, निफाड- ४५, नांदगाव- २७, येवला- २३ आणि दिंडोरीसाठी २० उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत. शुक्रवारी छाननीनंतर पात्र उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली. आता येत्या ८ जुलैपर्यंत अर्ज माघारीसाठी मुदत असून, त्यानंतरच अंतिम चित्र स्पष्ट होणार आहे. निवडणूक अधिकारी म्हणून अ‍ॅड. जालिंदर ताडगे यांच्यासह अ‍ॅड. संतोष दरगोडे व अ‍ॅड. अमोल आंधळे काम पाहत आहेत. यंदा कधी नव्हे इतकी चुरस निर्माण झाली आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Naik Institute Election: 443 candidates' application valid

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.