नायगावी क्षयरोग सप्ताह साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 00:22 IST2021-04-05T20:17:51+5:302021-04-06T00:22:10+5:30

नायगाव : जागतिक क्षयरोग रोग सप्ताहानिमित्ताने सिन्नर आगारातील कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन व मास्क, सॅनिटायझरचे वितरण करण्यात आले.

Naigavi Tuberculosis Week celebrated | नायगावी क्षयरोग सप्ताह साजरा

जागतिक क्षयरोग सप्ताहा निमित्ताने सिन्नर आगारातील कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन व सॅनिटायझर, मास्क आदींचे वितरण करताना क्षयरोग पर्यवेक्षक प्रकाश जाधव, समुपदेशक विलास बोडके, सचिन पांचाळ, अनिल नवले आदींसह कर्मचारी आदी. 

ठळक मुद्दे सिन्नर आगारातील कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन व मास्क, सॅनिटायझरचे वितरण

नायगाव : जागतिक क्षयरोग रोग सप्ताहानिमित्ताने सिन्नर आगारातील कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन व मास्क, सॅनिटायझरचे वितरण करण्यात आले.

आरोग्य विभाग व पंचायत समिती यांच्या वतीने जागतिक क्षयरोग दिनाची ह्यद क्लॉक इज टिकिंगह्ण ही थीम घेऊन हा जागतिक क्षयरोग सप्ताह साजरा होत आहे. आरोग्य विभाग जिल्हा क्षयरोग विभाग नाशिक,जिल्हा परिषद व नगरपालिका सिन्नर यांचे संयुक्त विद्यमाने क्षयरोग जनजागृती सप्ताह निमित्ताने राज्य परिवहन महामंडळाच्या सिन्नर आगार अधिकारी व कर्मचारी यांना मास्कचे वितरण सिन्नर पंचायत समिती आरोग्य विभागाचे वतीने करण्यात आले होते.

याप्रसंगी आगारप्रमुख भूषण सूर्यवंशी, एस काळे व नियंत्रक,वाहक, चालक, तंत्रज्ञ समवेत मुखपट्टी वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आले. सदर कार्यक्रम क्षयरोग, एचआयव्ही व कोविड याचे माहिती, संवाद माध्यमातून देऊन ह्यमाझे कुटुंब माझी जबाबदारीह्ण याचे पालन व प्रत्यक्ष कृती अंमलबजावणी गरज याचे सादरीकरण करण्यात आले.

याप्रसंगी प्रकाश जाधव वरिष्ठ क्षयरोग पर्यवेक्षक, विलास बोडके समुपदेशक, तसेच सचिन पांचाळ प्रयोगशाळा तंत्रज्ञ, अनिल नवले क्षयरोग सहायक आदी उपस्थित होते.

Web Title: Naigavi Tuberculosis Week celebrated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.