नाग्यासाक्या धरण पाणीपुरवठा योजना बंद; ग्रामस्थांत नाराजी

By Admin | Updated: March 18, 2017 23:20 IST2017-03-18T23:19:51+5:302017-03-18T23:20:12+5:30

नांदगाव : तालुक्यातील नाग्यासाक्या धरण पाणीपुरवठा योजना बंद पडल्याने ४२ गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे

Nagya sadak dam water supply scheme closed; Dismantling of the villagers | नाग्यासाक्या धरण पाणीपुरवठा योजना बंद; ग्रामस्थांत नाराजी

नाग्यासाक्या धरण पाणीपुरवठा योजना बंद; ग्रामस्थांत नाराजी

नांदगाव : तालुक्यातील नाग्यासाक्या धरण पाणीपुरवठा योजना बंद पडल्याने ४२ गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला असून, तातडीने सदर योजनेतून पाणीपुरवठा सुरू न झाल्यास या पाण्यावर अवलंबून असलेल्या गावांमधील जनता उपोषण करेल, असा इशारा माजी आमदार संजय पवार यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे.
या संदर्भात तहसीलदार चंद्रकांत देवगुणे यांची संजय पवार यांच्या नेतृत्वाखाली तालुका भाजपा अध्यक्ष दत्तराज छाजेड, माजी जि.प. सदस्य राजाभाऊ पवार, संजय आहेर, सरपंच अशोक पवार, जि.प. सदस्य आशाबाई जगताप, साहेबराव नाईकवाडे, मधुबाला खिरडकर व पाणीग्रस्त गावातील ग्रामस्थ यांच्या शिष्टमंडळाने भेट घेतली.
नागापूर, पांझणदेव, पानेवाडी, धोटाणे, ज्वार्डी अशा तालुक्यातील २६ गावामध्ये तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे.
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत सदर योजनेचे काम सुरू असून, ठेकेदाराला अदा करण्यात यावयाच्या देयकांवरून वाद आहेत. काही महिने पाणीपुरवठा केल्यानंतर अचानक तो बंद करण्यात आला.
योजनेच्या कार्यक्षेत्रातील गावे आवश्यक पाणी वर्गणी देण्यास तयार आहेत. मनसुख मोरे, मोतीराम कातकाडे, सुनीला काळे, चित्राबाई पगारे, शंकर गुंडगळ, आशाबाई काकड, सुरेश बेदाडे, रेखा उगले, बाळू धिवर, मीराबाई पवार, सखूबाई सोनावणे, अलका कुणगर, आशाबाई कदम, हिरामण व्हडगळ, त्र्यंबक करवर, अरुणाबाई माकुने, बाबा शेरमाळे, सुनीता वाघ, सत्यभामा काकळीज, लता नाईकवाडे, संदीप आहेर आदि ग्रामपचायतीचे सरपंच व सदस्य उपस्थित होते. (वार्ताहर)

Web Title: Nagya sadak dam water supply scheme closed; Dismantling of the villagers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.