शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
3
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
4
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
5
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
6
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
7
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
8
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
9
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
10
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
11
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
12
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
13
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
14
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
15
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
16
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
17
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
18
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
19
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
20
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

नाग्या-साक्याचे पाणी फक्त पिण्यासाठी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2018 18:33 IST

नाग्या-साक्या धरणात मृतपाण्याचा साठा असून, ते पाणी फक्त पिण्यासाठीच वापरावयाचे असल्याने त्यात गणपती विसर्जन करू नये या जलसंपदा विभागाच्या सूचनेनुसार यंदाचे गणपती विसर्जन नाग्या साक्यामध्ये करावयाचे नाही. असा महत्त्वपूर्ण निर्णय शांतता समितीच्या बैठकीत घेण्यात आला.

नांदगाव : नाग्या-साक्या धरणात मृतपाण्याचा साठा असून, ते पाणी फक्त पिण्यासाठीच वापरावयाचे असल्याने त्यात गणपती विसर्जन करू नये या जलसंपदा विभागाच्या सूचनेनुसार यंदाचे गणपती विसर्जन नाग्या साक्यामध्ये करावयाचे नाही. असा महत्त्वपूर्ण निर्णय शांतता समितीच्या बैठकीत घेण्यात आला. नगराध्यक्ष राजेश कवडे, पोलीस निरीक्षक अनिल भवारी यांनी त्याला दुजोरा देत सर्व गणेश मंडळांना आवाहन केले. सहायक पोलीस अधीक्षक रागीसुधा यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.नगराध्यक्ष राजेश कवडे यांनी शहरातील गणेश मंडळांनी मोठ्या मूर्तीचे यंदा विसर्जन करू नये. प्रत्येक मंडळाने मोठ्या मूर्ती घेतल्या असतील तर सोबत अर्ध्या फुटापेक्षा छोट्या मूर्ती घ्याव्यात व त्या मूर्तींचे प्रतीकात्मक विसर्जन करावे. त्यासाठी गणेशकुंड नगरपालिका तयार करून देईल. तसेच मोठ्या मूर्ती वर्षभर जतन करण्यासाठी नगरपालिका मदत करेल, असे आवाहन केले. नगराध्यक्ष कवडे यांच्या सूचनेचे स्वागत करण्यात आले.पोलीस ठाण्यात शहरातील विविध गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत बैठक झाली. शहरातील मूर्तींचे नाग्या-साक्या धरणात विसर्जन करण्याची प्रथा होती. ती यावर्षी खंडित झाली आहे. नाग्या-साक्या धरणातून जेमतेम शिलकी जलसाठ्यातून चांदवड-नांदगाव तालुक्यातील ४२ गावांच्या नळ योजनेसाठी पाणीपुरवठा केला जातो. तसेच टंचाईग्रस्त गावांना टँकरने पाणीपुरवठा केला जातो, अशी माहिती कर्मचारी नितीन धीवर यांनी या बैठकीत दिली होती. हा धागा पकडीत नगराध्यक्ष राजेश कवडे यांनी शहरातील मंडळांच्या कार्यकर्त्यांना गणेश विसर्जन करण्यासाठी मौलिक सूचना उपस्थित कार्यकर्त्यांना केली. त्याचे जोरदार स्वागत करण्यात आले. बाळासाहेब कवडे, संतोष गुप्ता, सुमित सोनवणे, योगेश सोनार, विशाल वडघुले आदींनी विविध सूचना केल्या. गेल्या वर्षी आयोजित गणेशमूर्ती स्पर्धेचे बक्षीस वितरण सहायक पोलीस अधीक्षक रागी सुधा, नगराध्यक्ष राजेश कवडे, ज्येष्ठ नागरिक मेजर जगन्नाथ साळुंके यांच्या हस्ते करण्यात आले. पोलीस निरीक्षक अनिल भवारी यांनी गणेशोत्सव काळात पालन करण्यासंबंधीच्या सूचना देताना ध्वनी पातळी ५५ ते ६० डेसिबल्स राखावी व मार्गदर्शक तत्त्वानुसार वेळ पाळण्याचे आवाहन केले. राजीव गांगुर्डे यांनी सूत्रसंचालन केले.

टॅग्स :WaterपाणीDamधरण