बनावट नोटा प्रकरणातील नागरेचा जामीन फेटाळला

By Admin | Updated: February 17, 2017 21:36 IST2017-02-17T21:36:52+5:302017-02-17T21:36:52+5:30

बनावट नोटा छपाईप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असलेला राष्ट्रवादी पक्षाचा माजी पदाधिकारी छबू नागरेचा

Nagrej's bail plea in the fake currency case was rejected | बनावट नोटा प्रकरणातील नागरेचा जामीन फेटाळला

बनावट नोटा प्रकरणातील नागरेचा जामीन फेटाळला

नाशिक : बनावट नोटा छपाईप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असलेला राष्ट्रवादी पक्षाचा माजी पदाधिकारी छबू नागरेचा जामीन अर्ज प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश अरुण ढवळे यांनी शुक्रवारी (दि़१७) फेटाळला़ तसेच या गुन्ह्यातील अन्य सात संशयितांना सशर्त जामीन मंजूर करण्यात आला आहे़ डिसेंबर २०१६ मध्ये आडगाव पोलिसांनी १३ संशयितांना बनावट नोटा प्रकरणी सापळा रचून अटक केली होती़
मुंबई-आग्रा महामार्गावरील जत्रा हॉटेल परिसरात आडगाव पोलिसांनी २३ डिसेंबर २०१६ रोजी तीन गाड्या अडवून एक कोटी ३५ लाख रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या होत्या़ या प्रकरणी प्रमुख संशयित छबू नागरे, महापालिकेचा माजी घंटागाडी ठेकेदार रामराव पाटील-चौधरी, रमेश पांगारकर यांसह अकरा संशयितांना अटक करण्यात आली होती़ या संशयितांच्या अटकेनंतर नागरे व कृष्णा अग्रवाल हे दोघांनी नकली नोटांचा छापखानाच सिडको परिसरात सुरू केल्याचे तपासात समोर आले़

Web Title: Nagrej's bail plea in the fake currency case was rejected

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.