नगरपंचायत निवडणूक प्रक्रियेत घोळ

By Admin | Updated: October 12, 2015 21:32 IST2015-10-12T21:31:16+5:302015-10-12T21:32:11+5:30

कळवण : नागरिकांमधून उमटल्या संतप्त प्रतिक्रि या

The Nagar Panchayat is in the process of election | नगरपंचायत निवडणूक प्रक्रियेत घोळ

नगरपंचायत निवडणूक प्रक्रियेत घोळ

कळवण : अत्यंत महत्त्वाचा टप्पा असलेल्या निवडणूक यंत्रणेवरील विश्वासाला तडा देण्याचे काम कळवणच्या नगरपंचायतीच्या पहिल्या निवडणुकीच्या निमित्ताने होतंय की काय, अशी शंका आता निर्माण होत आहे. यामुळे नागरिकांमधून उमटल्या संतप्त प्रतिक्रि या उमटल्या आहेत.
पाच दिवस उमेदवारांचे वाया गेले पाचव्या दिवशी एकही अर्ज दाखल होऊ शकला नाही. शेवटी ही गंभीर तक्रार निवडणूक आयोगाच्या कक्षेत गेली. शेवटी आयोगाने आॅन-लाइन उमेदवारी अर्ज भरण्याची पद्धत रद्द केली व पूर्वीसारखीच छापील अर्ज भरण्याची मुभा दिली.
आता फेरमतदानाचा प्रसंग टाळा
कळवण नगरपंचायतीच्या निवडणुकीतील प्रत्येक टप्प्यांवर प्रशासकीय गोंधळ स्पष्ट झाला आहे. या गोंधळाला जबाबदार कोण, त्यांच्यावर काय कारवाई होणार, यापेक्षा संपूर्ण निवडणूक यंत्रणेवरील विश्वास उडतो की काय, याची भीती वाटणे स्वाभाविक आहे. निवडणूक आयोगाच्या या प्रक्रियेबाबत ज्या ज्या ठिकाणी नगरपंचायतीच्या निवडणुका असतील त्या ठिकाणी तीव्र संताप दिसून आला. त्यामुळेच महाआॅनलाइनच्या कारभाराची चौकशी होणे आवश्यक आहे. अंतिम टप्प्यात उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्वापार पद्धतीने राबविण्याचा निर्णय आयोगाने घेतल्याने इच्छुक उमेदवारांना न्याय मिळाला. आॅनलाइन सेवेचा अनुभव नसलेल्या आदिवासीबांधव व सर्वसामान्य उमेदवारांना निवडणुकीच्या रिंगणात उतरता आले.
आता प्रत्यक्ष मतदान होऊन निकाल लागायचे आहेत. आतापर्यंत सर्वच प्रक्रि या पुन्हा नव्याने राबवाव्या लागल्या आहेत. ही निवडणूक आहे की पोरखेळ, अशी संतापाची भावना नगरपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने व्यक्त झाल्याने मतदान आणि मतमोजणी तरी पुन्हा घ्यावी लागणार नाही ना, याची खबरदारी नगरपंचायत प्रशासन आणि राज्य निवडणूक आयोगाने घ्यावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. (वार्ताहर)

Web Title: The Nagar Panchayat is in the process of election

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.