नगरपंचायतीच्या निवडणुका महाविकास आघाडीतर्फे लढणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 04:41 IST2020-12-11T04:41:36+5:302020-12-11T04:41:36+5:30

१२ ते २० डिसेंबर दरम्यान स्वाभिमानी सप्ताह साजरा केला जाणार आहे. या पार्श्वभूमीवर तालुक्यातील पदाधिकाऱ्यांची शासकीय विश्राम गृहावर बैठक ...

Nagar Panchayat elections will be contested by Mahavikas Aghadi | नगरपंचायतीच्या निवडणुका महाविकास आघाडीतर्फे लढणार

नगरपंचायतीच्या निवडणुका महाविकास आघाडीतर्फे लढणार

१२ ते २० डिसेंबर दरम्यान स्वाभिमानी सप्ताह साजरा केला जाणार आहे. या पार्श्वभूमीवर तालुक्यातील पदाधिकाऱ्यांची शासकीय विश्राम गृहावर बैठक पार पडली. या बैठकीनंतर पगार पत्रकारांशी बोलत होते. यावेळी पवार पुढे म्हणाले की, स्वाभिमानी सप्ताह काळात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. नगरपंचायतींच्या निवडणुका राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस व शिवसेना महाविकास आघाडीने संयुक्तपणे लढाव्यात, असा प्रस्ताव राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून ठेवण्यात आला आहे. एखाद्या ठिकाणी तडजोड न झाल्यास राष्ट्रवादी कॉंग्रेस स्वतंत्र भूमिका घेईल, असेही पगार यांनी सांगितले. तालुक्यातील ९९ ग्रामपंचायती निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस निवडणूक रिंगणात उतरणार आहे. तशा सूचना तालुका पदाधिकाऱ्यांना दिल्या आहेत, असेही पगार यांनी सांगितले. यावेळी तालुका कार्यकारिणीही जाहीर करण्यात आली आहे. पत्रकार परिषदेला तालुकाध्यक्ष संदीप पवार, विनोद शेलार, विनोद चव्हाण, अरुण अहिरे, स्वप्नील भदाणे, विजय पवार, महिला तालुकाध्यक्ष हेमलता मानकर, वैशाली मोरे, हेमा काकळीज आदिंसह पदाधिकारी उपस्थित होते.

===Photopath===

101220\10nsk_28_10122020_13.jpg

===Caption===

मालेगावी झालेल्या पत्रकार परिषदेत माहिती देताना राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पगार. समवेत तालुकाध्यक्ष संदिप पवार, विनोद शेलार, विनोद चव्हाण, हेमलता मानकर, वैशाली मोरे आदि.

Web Title: Nagar Panchayat elections will be contested by Mahavikas Aghadi