नगरपंचायत निवडणूक
By Admin | Updated: November 1, 2015 22:21 IST2015-11-01T22:18:17+5:302015-11-01T22:21:19+5:30
८० टक्के मतदान

नगरपंचायत निवडणूक
नाशिक : जिल्ह्यातील कळवण, देवळा, चांदवड, पेठ, सुरगाणा व निफाड या सहा नगरपंचायतींसाठी रविवारी सरासरी ८० टक्के मतदान झाले. किरकोळ अपवाद वगळता सर्वत्र मतदानप्रक्रिया शांततेत पार पडली. अनेक ठिकाणी मतदारांनी सकाळपासूनच मतदानासाठी रांगा लावल्या होत्या. मतदानादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडून नये म्हणून पोलिसांनी ठिकठिकाणी चोख बंदोबस्त ठेवला होता. उद्या सोमवारी (दि २) सकाळी १० वाजता मतमोजणी होणार असून, साधारणत: १२ वाजेपर्यंत चित्र स्पष्ट होण्याचा अंदाज संबंधित निवडणूक अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. सहा नगरपंचायतींसाठी झालेले मतदान पुढीलप्रमाणे- कळवण ७५.८२, देवळा ८२.५४, चांदवड ८०.१२, पेठ ८०.२४, सुरगाणा ७८.३०, निफाड ८१.१४.