नगर पंचायत रूपांतर प्रक्रिया सुरू; दिंडोरीबाबत संभ्रम सहा तालुक्यांना होणार नगर पंचायत, परिषद
By Admin | Updated: April 1, 2015 01:01 IST2015-04-01T00:58:13+5:302015-04-01T01:01:33+5:30
नगर पंचायत रूपांतर प्रक्रिया सुरू; दिंडोरीबाबत संभ्रम सहा तालुक्यांना होणार नगर पंचायत, परिषद

नगर पंचायत रूपांतर प्रक्रिया सुरू; दिंडोरीबाबत संभ्रम सहा तालुक्यांना होणार नगर पंचायत, परिषद
नाशिक : राज्य शासनाने जिल्'ातील सात तालुक्यांच्या मुख्यालयी असलेल्या ग्रामपंचायतींचे नगर पंचायत/परिषद यांच्यात रूपांतर करण्याचा निर्णय घेतल्यानंतर या ग्रामपंचायती बरखास्तीबाबत अधिसूचनाही आता जारी करण्यात आली असून, दिंडोरी वगळता अन्य सहा ग्रामपंचायतींचे आता नगर परिषद/पंचायतीमध्ये रूपांतर होण्याची प्रक्रिया सुरू झाल्याचे मानले जात आहे. यासंदर्भात दिंडोरी ग्रामपंंचायतीचे नगर परिषद/पंचायतीमध्ये रूपांतर करण्याच्या प्रक्रियेबाबत संभ्रम निर्माण झाला असून, त्याबाबत शासन स्तरावरून मार्गदर्शन मागवून दिंडोरी ग्रामपंचायतीची की नगर पंचायतीची निवडणूक होणार, याबाबत योग्य ती कार्यवाही करावी, याबाबतचे निवेदन रणजित देशमुख यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे. शासनाने नाशिक जिल्'ातील चांदवड, देवळा, सुरगाणा, पेठ, निफाड, कळवण आदि ग्रामपंचायतींचे नगर परिषद/पंचायतीत रूपांतर करण्याबाबत १० मार्च २०१५ रोजी अधिसूचना जारी झाली आहे. या अधिसूचनेत दिंडोरी ग्रामपंचायतीऐवजी दिंडोरी गट असा चुकून उल्लेख झाला असून, त्यामुळे दिंडोरी ग्रामपंचायतीची की नगर पंचायतीची निवडणूक होईल, याबाबत नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला असून, त्याबाबत योग्य ती कार्यवाही तत्काळ करण्यात यावी, अशी मागणी दिंडोरीचे रणजित देशमुख यांनी केली आहे.(प्रतिनिधी)