नागापूरला हाणामारी प्रकरणी चौदा जणांवर गुन्हा दाखल

By Admin | Updated: May 11, 2017 01:33 IST2017-05-11T01:33:01+5:302017-05-11T01:33:12+5:30

मनमाड : नागापूर ता. नांदगाव येथे वादातून झालेल्या हानामारीत एक महिला जखमी झाली आहे. माजी आमदार पुत्रासह चौदा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Nagapur files criminal charges against fourteen accused | नागापूरला हाणामारी प्रकरणी चौदा जणांवर गुन्हा दाखल

नागापूरला हाणामारी प्रकरणी चौदा जणांवर गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्क
मनमाड : येथून जवळच असलेल्या नागापूर ता. नांदगाव येथे अंतर्गत वादातून झालेल्या हानामारीत एक महिला जखमी झाली आहे. तीने दिलेल्या फिर्यादीवरून माजी आमदार पुत्रासह चौदा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणी अकरा जणांना अटक करण्यात आली असून उर्वरीत आरोपिंचा शोध सुरू आहे.
नागापूर येथे जुन्या भांडणाच्या कुरापतीवरून पीडित महिला व सुरज पवार यांच्यात वाद झाला. मारहान करून दुखापत केली व घरात घुसून कपड्यांची ओढातान करून विनयभंग केल्याची फिर्याद हानामारीत जखमी झालेल्या महिलेने मनमाड पोलीस स्थानकात दिली. या प्रकरणी सुरज पवार याच्यासह चौदा आरोपिंच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Nagapur files criminal charges against fourteen accused