पेठरोडवर चौघा संशयितांकडून मायलेकरास मारहाण

By Admin | Updated: April 3, 2017 18:43 IST2017-04-03T18:43:44+5:302017-04-03T18:43:44+5:30

किरकोळ कारणावरून चौघा संशयितांनी मायलेकरास शिवीगाळ करीत लाकडी दांडक्याने मारहाण केल्याची घटना रविवारी (दि़२) दुपारी पंचवटी पेठरोडवरील पवार चाळीत घडली़

Mylcaras beat up four suspects on Peth Road | पेठरोडवर चौघा संशयितांकडून मायलेकरास मारहाण

पेठरोडवर चौघा संशयितांकडून मायलेकरास मारहाण

नाशिक : किरकोळ कारणावरून चौघा संशयितांनी मायलेकरास शिवीगाळ करीत लाकडी दांडक्याने मारहाण केल्याची घटना रविवारी (दि़२) दुपारी पंचवटी पेठरोडवरील पवार चाळीत घडली़
पंचवटी पोलीस ठाण्यात संजय अण्णा पवार (३७, रा़रामनगर गार्डनजवळ, पवार चाळ, पेठरोड) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार संशयित बाळू हिरामण धोत्रे, विशाल बाळू धोत्रे, संतोष रामू पवार, शंकर रामू पवार हे चौघे दुपारी ३ वाजेच्या सुमारास घराजवळ आले व शिवीगाळ सुरू केली़ यानंतर बाळू धोत्रे याने मी तुझ्या भावाला चाकू मारला होता का, असे म्हणत सर्वांनी संजय पवार यांना लाथाबुक्क्यांनी तसेच लाकडी दांडक्याने मारहाण केली़ दरम्यान, पवार यांची आई भांडण सोडविण्यासाठी गेली असता तिलाही लाकडी दांडक्याने मारहाण करण्यात आली़
याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात चौघा संशयितांविरोधात मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

Web Title: Mylcaras beat up four suspects on Peth Road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.