नाशिक-पुणे महामार्गावर अपघातात मायलेक ठार
By Admin | Updated: March 30, 2016 01:25 IST2016-03-30T01:03:02+5:302016-03-30T01:25:53+5:30
नाशिक-पुणे महामार्गावर अपघातात मायलेक ठार

नाशिक-पुणे महामार्गावर अपघातात मायलेक ठार
सिन्नर : नाशिक - पुणे महामार्गावर नादुरुस्त खासगी आराम बसला धडक देऊन कार उलटून झालेल्या अपघातात भुसावळ येथील मायलेक जागीच ठार झाले, तर बाप-लेक जखमी झाले. सिन्नरजवळील गुरेवाडी शिवारात लेंडीनाल्यावर मंगळवारी सकाळी ९ वाजेच्या सुमारास सदर अपघात झाला.
मूळ भुसावळ, प्रभाकर हॉलजवळ राहणाऱ्या पाटील कुटुंबीयांच्या कारला झालेल्या भीषण अपघातात ३०वर्षीय महिलेसह तिचे ४ वर्षांचे बालक ठार झाले आहे. जखमी पाटील पितापुत्रास नाशिक येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
भुसावळ येथील सचिन अशोक पाटील (३५) व त्याची पत्नी निशा हे दाम्पत्य खडकी, पुणे येथे नोकरीनिमित्त स्थायिक झाले आहेत. सचिन हा खडकी येथील दारूगोळा बनविणाऱ्या कारखान्यात नोकरी करतो, तर त्याची पत्नी मयत निशा या खासगी नोकरी करीत असल्याची माहिती मिळाली. पाटील कुटुंबीय मंगळवारी पहाटे पुण्याहून भुसावळकडे आपल्या होंडा सिटीने (क्रम. एमएच १२ एलडी ७९२९) निघाले होते. सिन्नरजवळील गुरेवाडी शिवारात खासगी आराम बस (एमएच १५ एके १६१२) नादुरुस्त झाल्याने रस्त्याच्या कडेला उभी होती. कारने लेंडी नाल्याजवळील पुलाजवळील दुभाजक व खासगी आराम बसला धडक दिली. त्यानंतर उलटल्याचे प्रत्यक्षदर्शिंनी सांगितले. या अपघातात निशा सचिन पाटील (३०) व मुलगा सार्थक (४) हे दोघे जागीच ठार झाले, तर सचिन अशोक पाटील (३५) व अशोक किसन पाटील (६०) हे जखमी झाले. जखमींना नाशिकच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. (वार्ताहर)
सिन्नर पालिका रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक पुंडलिक सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार दत्तात्रय खतिले अधिक तपास करीत आहेत. (वार्ताहर)