पिंपळगाव बसवंत येथे मायलेकीची आत्महत्त्या
By Admin | Updated: November 27, 2015 23:16 IST2015-11-27T23:15:48+5:302015-11-27T23:16:25+5:30
पिंपळगाव बसवंत येथे मायलेकीची आत्महत्त्या

पिंपळगाव बसवंत येथे मायलेकीची आत्महत्त्या
पिंपळगाव बसवंत : वावी ठुशी येथे एका विवाहितेने शुक्र वारी (दि. २७) आपल्या दोन मुलींसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्त्या केली. वावी ठुशी येथील शीतल भरत हिरे (२७) या महिलेने आपल्या दोन मुलींसह निवृत्ती सदाशिव हिरे यांच्या शेतातील विहिरीत उडी घेतली. यात शीतल हिरे व दोन वर्षांची मुलगी सलोनी भरत हिरे यांचा मृत्यू झाला असून, एका मुलीला जीवदान मिळाले आहे. पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केल्यानंतर दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविले होते. शवविच्छेदनानंतर या मालेकीवर अंत्यसंस्कार करण्यात आले़ या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत पिंपळगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची कार्यवाही सुरू होती. या प्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक पाटील करीत आहेत. येथील अशोक हिरे यांनी या घटनेची माहिती पोलिसांना दूरध्वनीवरून दिली. घटनेचे वृत्त गावात पसरल्याने येथील ग्रामस्थांनी घटनास्थळी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. (वार्ताहर)