शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

उड्डाणपुलावरील अपघातात  माय-लेकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2018 01:46 IST

शहरातील कमोदनगरजवळ उड्डाणपूल ओलांडताना झालेल्या भीषण अपघातात माय-लेकाचा करुण अंत झाल्याची घटना बुधवारी सायंकाळी घडली. अपघातात दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.

नाशिक : शहरातील कमोदनगरजवळ उड्डाणपूल ओलांडताना झालेल्या भीषण अपघातात माय-लेकाचा करुण अंत झाल्याची घटना बुधवारी सायंकाळी घडली. अपघातात दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.  सिडकोमधील सुंदरबन कॉलनीकडे जाण्यासाठी उड्डाणपूल ओलांडणाऱ्या तांबट व कासार कुटुंबातील सदस्यांना मुंबईकडून शहराकडे भरधाव जाणाºया अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. ही धडक भीषण असल्याने चारवर्षीय मुलासह मातेचा जागीच मृत्यू झाला. यावेळी  ज्येष्ठ नागरिक भटुलाल कासार पूल ओलांडला असल्याने ते सुदैवाने  बचावले. अपघातानंतर वाहनचालक घटनास्थळा-वरून फरार झाला. या घटनेमुळे हळहळ व्यक्त करण्यात येतआहे.  कमोदनगर परिसरातून सिडकोकडे जाताना बुधवारी (दि.२९) उड्डाणपुलावर एका अज्ञात वाहनाच्या धडकेत शीतल आशिष तांबट (३०, रा. गोपाल-कृष्ण चौक) व त्यांचा मुलगा कुणाल तांबट हे जागीच ठार झाले तर यशोदा भटुलाल कासार (६५) यांच्या पायावरून वाहनाचे चाक गेल्याने त्या गंभीर जखमी झाल्या तसेच मयत शीतल यांचे सासरे सुभाष चुनीलाल तांबट (५५) यांनाही वाहनाची धडक बसल्याने तेदेखील गंभीर असून, त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी उड्डाणपुलावर एकच धाव घेतली तसेच अंबड पोलीस ठाण्यालाही अपघाताची माहिती कळविण्यात आली. घटनास्थळावरून अज्ञात वाहनचालक अपघातग्रस्त वाहनासह फरार झाल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलीस निरीक्षक सोमनाथ तांबे, उपनिरीक्षक तुषार चव्हाण, राकेश शेवाळे यांच्या आदींनी घटनास्थळी दाखल होऊन जखमींना तत्काळ रुग्णवाहिकेतून जिल्हा रुग्णालयात पाठविले. तसेच बिनतारी संदेश यंत्रणेवरून अपघातग्रस्त वाहनाच्या वर्णनाचा संदेशही प्रसारित करण्यात आला. वैद्यकीय अधिकाºयांनी माय-लेकाला मयत घोषित केले. सुंदरबन कॉलनीमधील तांबट कुटुंबीयांची सून व नातवाचा अपघातात मृत्यू झाल्याने संपूर्ण कॉलनीसह सिडको परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात अज्ञात वाहनचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.उड्डाणपुलाच्या त्रुटीचे बळीमुंबई-आग्रा महामार्गावरील उड्डाणपूल उभारणीच्या त्रुटींचे बळी सुंदरबन कॉलनीजवळ सिडकोचे माय-लेक ठरले. सिडको सुंदरबन कॉलनीतून इंदिरानगरकडे जाणाºया रस्त्यालगत उड्डाणपुलाला बोगदा तयार करणे गरजेचे होते; मात्र या ठिकाणी राज्य सरकार व महामार्ग प्राधिकरणाने लक्ष घातले नाही. त्यामुळे बोगदा तयार होऊ शकला नाही. परिणामी सुंदरबन कॉलनी व सिडकोमधील रहिवाशांना इंदिरानगर, राजीवनगर, कमोदनगर आदी परिसरात जाण्यासाठी थेट उड्डाणपूल ओलांडावा लागतो आणि अपघातांना निमंत्रण मिळते.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यू