शहरं
Join us  
Trending Stories
1
नवा कामगार कायदा...! आता १ वर्षानंतर मिळणार ग्रॅच्युइटी; ५ वर्षांची अट बदलली...
2
पायलट 'निगेटिव्ह-जी ॲक्रोबॅटिक' युद्धाभ्यास करायला गेला अन्...; दुबई एअर शोमध्ये 'तेजस' विमान अपघाताचे कारण समोर आले...
3
भारतीय ज्युनियर महिला हॉकी संघाच्या प्रशिक्षकावर लैंगिक छळाचा आरोप; क्रीडा मंत्रालयाने चौकशीचे दिले आदेश
4
हिडमाचा खात्मा बनावट चकमकीत ? माओवाद्यांचा पत्रकातून गंभीर आरोप
5
वर्षाच्या अखेरीस आणखी एक महामारी येणार! नॉस्ट्राडेमसचे भाकित काय? जाणून घ्या
6
ऐतिहासिक निर्णय! देशात चार नवे कामगार कायदे तात्काळ लागू; २९ जुने कायदे रद्द, श्रम धोरणाला आधुनिक स्वरूप
7
धक्कादायक! पत्नीने प्रियकरासाठी लग्नाच्या सातव्या दिवशी पतीची हत्या केली
8
उद्धव ठाकरेंचा भाजपाला मोठा धक्का; ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत बडा नेत्याच्या हाती शिवबंधन
9
IND A vs BAN A : 'सुपर ओव्हर'मध्ये भारताचा फ्लॉप शो! एकही चेंडू न खेळता बांगलादेशनं गाठली फायनल
10
“मालेगाव प्रकरणी आरोपीला फाशी द्या, राज्यात महिला मुलींची सुरक्षा रामभरोसे”: हर्षवर्धन सपकाळ
11
बिहारमध्ये भाजपाचा डाव! नितीश कुमारांना मुख्यमंत्रीपद दिलं पण, गृहमंत्रीपद स्वतः कडे ठेवले, २० वर्षांनंतर खाते सोडले
12
कर्नाटकच्या राजकारणात खळबळ! "सर्व १४० आमदार माझ्यासोबत", डी. के. शिवकुमार यांचे थेट विधान
13
तुम्हाला तुमची गाडी खूपच प्यारी आहे...! २० वर्षांहून जुन्या वाहनांच्या फिटनेस टेस्ट शुल्कात १५ पट वाढ
14
फेस्टीव्ह संपला नाही तोच...! फ्लिपकार्ट 'ब्लॅक फ्रायडे सेल २०२५' ची तारीख ठरली, अमेझॉन थांबतेय होय...
15
'G-20 मध्ये सामील होणार नाही', डोनाल्ड ट्रम्प दक्षिण आफ्रिकेच्या राष्ट्राध्यक्षांवर नाराज, कारण...
16
जॉब, इन्व्हेस्टमेंट, WFH च्या नावाने फ्रॉड; ऑपरेशन CyHawk अंतर्गत ४८ तासांत ८७७ जणांना अटक
17
Tejas Fighter Jet Crashed : भारताचे लढाऊ विमान तेजस कोसळले, पायलटचा मृत्यू; दुबई एअर शो दरम्यान मोठी दुर्घटना
18
भाजपा-शिंदे गटात वाद, चंद्रशेखर बावनकुळे थेट बोलले; म्हणाले, “कारवाई करू, आमचे संस्कार...”
19
Travel : अवघ्या ३ दिवसात फिरता येईल 'हा' सुंदर देश; भारताचे १०००० होतील तब्बल ५८०००! फिरण्यासाठी बेस्ट
20
स्लीपर वंदे भारत देशभर फिरवली, ट्रायलनंतर परत पाठवली; ५ फॉल्ट समोर आले, लोकार्पण लांबणार?
Daily Top 2Weekly Top 5

‘माझे दुकान, माझी मागणी हक्कासाठी..!’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2020 01:00 IST

लासलगाव : राज्य सरकारने सर्व व्यावसायांना परवानगी दिलेली असताना सलून व्यावसायिकांना परवानगी नाकारली आहे, याचा निषेध करण्यासाठी लासलगाव नाभिक समाजाच्या वतीने अर्धनग्न आंदोलन करत शासनाचे लक्ष वेधले व सलून व्यवसाय सुरू करण्यास तातडीने परवानगी मिळावी, अशी मागणी करण्यात आली.

लासलगाव : राज्य सरकारने सर्व व्यावसायांना परवानगी दिलेली असताना सलून व्यावसायिकांना परवानगी नाकारली आहे, याचा निषेध करण्यासाठी लासलगाव नाभिक समाजाच्या वतीने अर्धनग्न आंदोलन करत शासनाचे लक्ष वेधले व सलून व्यवसाय सुरू करण्यास तातडीने परवानगी मिळावी, अशी मागणी करण्यात आली. यावेळी लासलगाव येथील कामगार तलाठी सागर शिर्के यांना निवेदन देण्यात आले. निवेदनाच्या प्रती तहसीलदार व उपविभागीय अधिकारी निफाड यांना पाठविण्यात आल्या आहेत. यावेळी श्री संत सेना चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष अरविंद देसाई, अनिल वाघ, अशोक जगताप, राजाभाऊ जाधव, संदीप वाघ, तुषार जगताप, नितीन वाघ, महेश साळुंखे, रवि वाघ, अभिजित जगताप, मगन औटे, रमेश वाघ, शशिकांत महाले, दिलीप साळुंखे, महेश संत, नितीन वाघ, दत्ता वाघ, राजेंद्र वाघ, विजय जाधव, सुनील वाघ, परेश जाधव, मनीष देसाई आदी उपस्थित होते.पिंपळगाव बसवंत : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन सुरू झाल्यापासून ते आजपर्यंत पिंपळगाव बसवंत शहरातील सलून व्यावसायिकांची दुकाने पूर्णत: बंदच आहेत. यामुळे व्यावसायिकांची उपासमार सुरू आहे. शासनाकडे वेळोवेळी मागणी करूनही दुकाने सुरू न केल्याने सलून व्यावसायिकांनी जुना आग्रारोड परिसरात फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करत निदर्शने केली तसेच सलून दुकानाबाहेर काळ्या फिती लावून राज्य शासनाचा निषेध नोंदविला.यावेळी नाभिक समाजाचे जिल्हाध्यक्ष संजय वाघ, पिंपळगाव सलून असोसिएशनचे श्रीकांत वाघ, वसंत सोनवणे, सुनील गरुड, दौलत विश्वासराव, उत्तम वाघ, हरिष बिडवई, कैलास वाघ, सचिन मोरे, अमोल गायकवाड, विजय जाधव, नितीन बिडवे आदी उपस्थित होते.नांदगाव : शहरातील सर्व केशकर्तनालय व ब्यूटिपार्लरचे व्यवसाय गेल्या तीन महिन्यांपासून बंद असून, उत्पन्नाचे दुसरे कोणतेही साधन नाही. त्यामुळे आमच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. तरी आम्हाला व्यवसाय सुरू करण्याची परवानगी द्यावी या मागणीचे निवेदन तहसीलदार उदय कुलकर्णी यांना नांदगाव शहर नाभिक संघटनेच्या वतीने देण्यात आले.कर्नाटक सरकारप्रमाणे आम्हाला दर महिना दहा हजार रुपये मानधन मिळावे, प्रत्येक व्यावसायिकाचा आरोग्य विमा उतरविण्यात यावा, सलून व्यावसायिकांचे गाळा भाडे व वीजबिल माफ करण्यात यावे, अशा मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत. निवेदनावर नाभिक समाज संघटनेचे तालुकाध्यक्ष राजेश निकम, शहराध्यक्ष विजय निकम, शरद बिडवे, रामदास गायकवाड, रवींद्र बिडवे, नरेंद्र निकम, लक्ष्मीकांत निकम, सोमनाथ निकम, दीपक झुंजारराव, महेश सोनवणे, सुधीर निकम, सतीश निकम, सतीश बिडवे, विजय गायकवाड, विजय निकम, रवींद्र निकम, दीपक निकम, ज्ञानेश्वर निकम, नीलेश निकम आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.चांदवड : शहरातील सलून व ब्यूटिपार्लर व्यवसाय सुरू करण्याची परवानगी द्यावी, अशा आशयाचे निवेदन चांदवड तालुका नाभिक संघटना व ब्यूटिपार्लर संघटनेच्या वतीने चांदवडचे उपविभागीय अधिकारी सिद्धार्थ भंडारे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनाच्या प्रती तहसीलदार प्रदीप पाटील, नगर परिषदचे मुख्याधिकारी अभिजित कदम यांना दिल्या. या शिष्टमंडळात नाभिक समाजाचे अध्यक्ष सचिन जगताप, गणेश जगताप, प्रवीण वाघ, ब्यूटिपार्लर संघटनेच्या विशाखा लोहारकर, सुवर्णा वाघ, परशराम नेवकर, हरिष जगताप, सागर जगताप, महेश बोºहाडे, बोरसे, गणेश गवळी, संजय जगताप, एकनाथ औंटे आदींचा समावेश होता. या निवेदनात म्हटले आहे की, सलून व्यवसाय, ब्यूटिपार्लर, बंद असून, मार्चपासून ते आजपावेतो लॉकडाऊनला पूर्णपणे साथ देऊन व्यवसाय बंद केले. परंतु इतर व्यवसाय जसे शासनाच्या अटी व शर्तीनुसार सुरू करण्यात आले त्याचप्रमाणे हा व्यवसाय सुरू करण्यास परवानगी द्यावी. नाभिक समाज हा अत्यंत गरीब असून, दररोज कमवून त्यावरच आपला व आपल्या कुटुंबीयांचा उदरनिर्वाह चालतो. तर लॉकडाऊन काळामध्ये जे दुकानाचे भाडे वीजबिल थकले आहे. ते माफ करून आम्हाला जोपर्यंत व्यवसाय सुरू होत नाही तोपर्यंत मासिक दहा हजार रुपये प्रमाणे मदत करावी, अशी मागणी निवेदनात केली आहे.---------------------------राज्यात जवळपास इतर सर्वच दुकाने चालू झाली असून, अनेक ठिकाणी फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा उडत आहे. तरीही त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात येते व नाभिक बांधव सर्व प्रकारची खबरदारी आणि दक्षता घेत असूनही सलून बंदीचा आदेश काढण्यात येतो हे पूर्णपणे चुकीचे आहे.- मधुकर बोरसे, अध्यक्ष महाराष्ट्र नाभिक समाज महामंडळ, कळवण

टॅग्स :Nashikनाशिक