शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड यांच्या राजीनाम्याचं टायमिंग अनेकांना न पटण्यासारखे; 'त्या' ३ तासांत काय घडले?
2
एकदा- दोनदा नाही, एअर इंडियाला सहा महिन्यात ९ कारणे दाखवा नोटीस बजावल्या; सरकारची माहिती
3
जगदीप धनखड यांचा उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा; प्रकृतीच्या कारणास्तव निर्णय
4
आजचे राशीभविष्य, २२ जुलै २०२५: 'या' २ राशींसाठी लाभदायी दिवस, अचानक धनलाभ होईल
5
'आम्ही अणुकार्यक्रम सुरूच ठेवणार', युरोपीय देशांशी चर्चेपूर्वी इराणचा अमेरिकेला संदेश
6
पहिला दिवस गोंधळाचा; विरोधक झाले आक्रमक; पहलगाम हल्ला ते बिहार मतदारयादीवरून गोंधळ 
7
शाळेवर विमान कोसळून २० ठार; बांगलादेशात अहमदाबादची पुनरावृत्ती!
8
एअर इंडिया विमानाचे तीन टायर फुटले; विमानतळावर लँडिंगच्या वेळी पावसामुळे विमानाने धावपट्टी सोडली
9
मुख्यमंत्र्यांनी कोकाटेंना सुनावले; जे काही घडले ते भूषणावह नाही!
10
ब्रिगिट मॅक्रॉन ‘पुरुष’? खटले आणि वादांना ऊत! दाव्याची सत्यता काय?
11
अंधेरी मेट्रो स्थानकात गळती; पाणी गोळा करण्यासाठी बादल्यांचा वापर
12
भाजपचा नवा फॉर्म्युला; प्रत्येक आमदाराची पाच कामे होणार! पालिका निवडणुकीसाठी रणनीती
13
परिचारिकांच्या संपामुळे पाच दिवसांपासून रुग्णांचे हाल; नियमित शस्त्रक्रियाही पूर्णपणे बंद
14
विधवा महिलेस १.२० लाखात गुजरातेत विकले, दोन वर्षांनी पुत्रप्राप्तीनंतर आणून गावात सोडले!
15
सोळावे वरीस... धोक्याचे नव्हे, निवडणुकीत मत देण्याचे! ब्रिटनचा धाडसी निर्णय; युवाशक्ती लोकशाहीत सहभागी!
16
शेअर ट्रेडिंगच्या बहाण्याने वृद्धेसह पायलटला १० कोटींचा गंडा; बनावट ॲपचा वापर करून लावला चुना
17
६३ खासदार म्हणतात, न्या. वर्मांना पदावरून हटवा! कारण काय?
18
संपादकीय : नामुष्कीचा बॉम्ब, १९ वर्षांनंतरही पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह
19
विशेष लेख : कुणी काय खावे, याच्याशी सरकारचा काय संबंध?
20
महाराष्ट्रातील ४ लाख शेतकरी लाभार्थी यादीतून झाले गायब; लाभार्थी १०.२ लाखांवरून केवळ १५ हजारांवर

माझी स्क्रिप्ट पवार, फडणवीस यांनी लिहिली नाही : भुजबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2023 06:28 IST

भुजबळ यांनी त्यांच्याकडे एवढी संपत्ती आहे, याबद्दल मी दमानिया यांचे अभिनंदन करतो, अशी टिप्पणी केली.

लोकमत न्यूज नेटवर्क नाशिक : माझी स्क्रिप्ट शरद पवार लिहून देत नव्हते आणि आताही अजित पवार किंवा देवेंद्र फडणवीस यांनी लिहिलेली नाही. भुजबळ कोणाची स्क्रिप्ट वाचत नाही, असा टोला ओबीसी नेते तथा राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी मंगळवारी विरोधकांना लगावला. 

जरांगे पाटील, दमानिया यांना शुभेच्छामराठा समाजाचे नेते मनोज जरांगे - पाटील यांची नाशिक जिल्ह्यात सभा होणार आहे. त्याबद्दल विचारल्यानंतर भुजबळ यांनी जरांगे  यांना शुभेच्छा दिल्या, तर अंजली दमानिया यांनी अलीकडेच केलेल्या आरोपावर ते म्हणाले की, यापूर्वी माजी खासदार समीर भुजबळ यांनी ब्लॅकमेलरबद्दल भूमिका मांडली आहे.  छगन भुजबळांसारखे पाच जण जेवढे कर भरत नाहीत एवढा कर माझे पती भरतात, असे अंजली दमानिया म्हटल्याचे विचारल्यावर भुजबळ यांनी त्यांच्याकडे एवढी संपत्ती आहे, याबद्दल मी दमानिया यांचे अभिनंदन करतो, अशी टिप्पणी केली.

जालना येथील ओबीसी एल्गार सभेत आक्रमक भाषण केल्यानंतर स्क्रिप्ट कोणी लिहिली, असा सवाल भुजबळ यांच्या विरोधकांनी केला होता. त्यासंदर्भात प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना भुजबळ म्हणाले की, ओबीसींच्या हक्काची स्क्रिप्ट मी ३५ वर्षांपासून  सादर करीत आहे. माझी ही स्क्रिप्ट फुले - शाहू - आंबेडकर यांनी लिहिलेली आहे. 

‘मी एकटा पडलेलो नाही’ nओबीसी आरक्षणासाठी मी एकटा पडलेलो नाही. मात्र, काहींना व्यासपीठावर येण्यात अडचण येते. nतर काहीजण व्यासपीठावर आल्यानंतर पुन्हा वेगळी भूमिका घेत आहेत, असे करण्यामागे ज्याचा त्याचा प्रश्न आहे, ज्याने त्याने आपापल्या पक्षात राहून का होईना; परंतु, ओबीसींच्या पाठीशी उभे राहावे, असे आवाहन भुजबळ यांनी केले. 

टॅग्स :Chhagan Bhujbalछगन भुजबळManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलOBC Reservationओबीसी आरक्षण