माझे कुटुंब -माझी जबाबदारी उपक्र माला अभोण्यात सुरूवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2020 18:07 IST2020-09-20T18:07:29+5:302020-09-20T18:07:37+5:30
अभोणा : कोरोना विषाणूवर नियंत्रण मिळविण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने सुरू केलेल्या माझे कुटुंब माझी जबाबदारी उपक्र मास तहसिलदार बी. ए. कापसे यांच्या प्रमुख उपस्थितीत कळवण प. स. चे गटविकास अधिकारी डी. एम. बिहरम यांचे हस्ते प्रारंभ करण्यात आला.

माझे कुटुंब -माझी जबाबदारी उपक्र माला अभोण्यात सुरूवात
अभोणा : कोरोना विषाणूवर नियंत्रण मिळविण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने सुरू केलेल्या माझे कुटुंब माझी जबाबदारी उपक्र मास तहसिलदार बी. ए. कापसे यांच्या प्रमुख उपस्थितीत कळवण प. स. चे गटविकास अधिकारी डी. एम. बिहरम यांचे हस्ते प्रारंभ करण्यात आला.
या प्रसंगी ग्रामपालिका प्रशासक कांतिलाल चव्हाण, ग्रामसेवक जीभाऊ जाधव, नांदुरी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकिय अधिकारी श्रीमती डॉ. एन. केपी सिध्दू, आरोग्य सहायक धनसिंग शिंदे, आरोग्यसेविका श्रीमती प्रमिला खरे यांचेसह अंगणवाडी सेविका, आशासेविका आदी उपस्थित होते. सदर तपासणी मोहीमेसाठी ५ पथके तयार करून त्यात २० कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. आत्तापर्यंत १०० कुटुंबांची तपासणी करण्यात आली आहे.
(फोटो १९ अभोणा १)
अभोणा येथे माझे कुटुंब माझी जबाबदारी उपक्र मांतर्गत आरोग्य तपासणी करतांना आरोग्य कर्मचारी. समवेत तहसिलदार कापसे, बिडीओ बहिरम, कांतीलाल चव्हाण आदी.