शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

माझी उमेदवारी दिल्लीतून ठरली! प्रस्ताव मान्य, मात्र अंतिम निर्णय पक्ष घेईल; काय म्हणाले भुजबळ?

By संजय पाठक | Updated: March 30, 2024 15:46 IST

 दरम्यान या संदर्भात आता विद्यमान खासदारांनी आग्रह धरल्यामुळे महायुती काय निर्णय घेते हे आपण बघणार आहोत असे ते म्हणाले. आपल्याला संधी मिळाली तर आपण जरूर काम करू असे ते म्हणाले.

नाशिक- लोकसभेच्या नाशिकच्या जागेसाठी घमासान सुरू असून राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे नेते आणि राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांचे नाव उमेदवारीसाठी पुढे आल्यानंतर शिंदे गटाचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे आक्रमक झाले आहेत आज सकाळी त्यांनी नाशिकमध्ये मारुती मंदिरात महाआरती करून अप्रत्यक्षरीत्या प्रचाराचा नारळ फोडला तर दुसरीकडे छगन भुजबळ यांनी माध्यमांशी संवाद साधताना आपल्याला उमेदवारीचा प्रस्ताव काही महिन्यांपूर्वी दिल्लीत झालेल्या बैठकीत महायुतीकडून आला. त्यानुसार आपण चाचपणी केली आहे असे सांगितले. त्यामुळे नाशिकच्या जागेचा सस्पेन्स वाढला आहे. दरम्यान या संदर्भात आता विद्यमान खासदारांनी आग्रह धरल्यामुळे महायुती काय निर्णय घेते हे आपण बघणार आहोत असे ते म्हणाले. आपल्याला संधी मिळाली तर आपण जरूर काम करू असे ते म्हणाले.दरम्यान, भुजबळ यांच्या उमेदवारीची घोषणा होण्याच्या आधीच नाशिक शहराजवळ ते मराठा आरक्षण विरोधी असल्याचे फलक लावण्यात आले होते त्यावरून भुजबळ यांनी नाराजी व्यक्त केली. लोकशाहीमध्ये अशा प्रकारचे फलक लावणे चुकीचे आहे आपण कधीही मराठा आरक्षणाला विरोध केला नाही असे ते म्हणाले केवळ आपल्यालाच नव्हे तर पंकजा मुंडे आणि प्रणिती शिंदे यांनाही अशाच प्रकारे विरोध झाला आहे. त्यांच्या गाड्या आडवणे आणि गांवबंदीचे फलक लावणे असे प्रकार सुरू आहे. त्यांनी पण कधीही मराठा आरक्षणाला विरोध केला नाही की सभाही घेतल्या नाहीत तरीही होत असलेला विरोध म्हणजे ओबीसी आणि दलित समाजाने निवडणूक लढवायची नाही का असा प्रश्नही भुजबळ यांनी उपस्थित केला. आपण विकासाच्या जोरावरच आजपर्यंत काम करत आलो आहोत जे प्रकल्प नाशिक मध्ये राबवले त्याचा लाभ सर्व समाजाला समाजाला झाला केवळ ओबीसी समाजाला झालेला नाही असेही ते म्हणाले.

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Chhagan Bhujbalछगन भुजबळPoliticsराजकारण