एमएक्स-१ रेसमध्ये हरिथ नोहा दोन्ही फेरीत विजय

By Admin | Updated: November 10, 2014 00:59 IST2014-11-10T00:59:10+5:302014-11-10T00:59:54+5:30

एमएक्स-१ रेसमध्ये हरिथ नोहा दोन्ही फेरीत विजय

In the MX-1 race, Harihitha Neha won both the rounds | एमएक्स-१ रेसमध्ये हरिथ नोहा दोन्ही फेरीत विजय

एमएक्स-१ रेसमध्ये हरिथ नोहा दोन्ही फेरीत विजय

पाथर्डीगाव- शिवारातील कुटे ट्रॅकवर दुपारी २ पासून या स्पर्धांना सुरुवात झाली़ एमएक्सच्या प्रमुख चार रेस मोटो-१ व मोटो-२ अशा दोन फेऱ्यांमध्ये पार पडल्या, तर दोन रेस या लहान मुलांच्या पार पडल्या़ एमएक्स-१ रेसमध्ये राष्ट्रीय खेळाडू हरिथ नोहाने दोन्ही फेरीत विजय मिळवत प्रथम क्रमांक पटकावला़ त्याने प्रथमपासून स्पर्धेवर वर्चस्व राखले़ त्याच्या गाडीने दोन चढाव एकाच उडीत उंच हवेत जात पार केले़ त्यास लढत देण्याचा प्रयत्न श्रीलंकन खेळाडू ईशान दशनायकेने केला; परंतु नोहाने सहज विजय संपादन केला़ तत्प्ूर्वी प्रथम पार पडलेल्या एमएक्स-३ रेसमध्ये सात स्पर्धकांनी सहभाग घेतला. मोटो-१ मध्ये समिम खानने प्रथमपासून आघाडी घेत पूर्ण गुण वसूल केले़ त्याला विनीत कुरूपने जबरदस्त लढत देत अनेकदा आघाडी घेण्याचा प्रयत्न केला़ दुसऱ्या फे रीत जबरदस्त स्पर्धा झाली. यामध्ये अमिर दळवीने जबदस्त आघाडी घेत शमीमचे गुण कमी केले़ अखेर ३७ गुण मिळवत शमिम खान प्रथम स्थानी राहिला, तर अमिर दळवी दुसऱ्या स्थानावर आला़ विनीत कुरूप तिसऱ्या स्थानी गेला़
४एमएक्स-२ मध्ये नाशिकचा रायडर गणेश लोखंडेकडून सर्वांना आशा होत्या. गणेशनेही जबरदस्त रायडिंग करत पूर्ण केल्या़ मोटो-१ फेरीत सहज विजय मिळवणाऱ्या गणेशला दुसऱ्या फेरीत प्रिन्स सिंग तसेच विशाल बारगजे, श्रीलंकन खेळाडू सूर्यंश राठोरे यांनी रोखण्याचे प्रयत्न केले; परंतु सर्वांना मागे टाकत गणेशने विजय मिळवला़
४गणेशच्या विजयाने ट्रॅकवर एकच जल्लोष झाला़ नाशिककरांना अभिवादन करत गणेशने संपूर्ण ट्रॅकवर गाडी उंच उडवत एक फेरी पूर्ण करत आनंद साजरा केला, तर लहान गटाच्या स्पर्धेत ७ ते १५ वयोगटातील मुलांनी चित्तथरारक उड्या घेत सर्वांना आश्चर्यचकित केले़

Web Title: In the MX-1 race, Harihitha Neha won both the rounds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.