सिन्नर : ईद उल अज्हा (बकरी ईद)ची नमाज सिन्नर शहरात उत्साहात पार पडली. राज्यात व देशात कोरोना विषाणूंचा वाढता संसर्ग व सिन्नर शहर लॉकडाऊन असल्याने कोणत्याही प्रकारची गर्दी न करता शासनाने दिलेले निर्देश पाळून सर्व मुस्लिम समाज बांधवांनी आपआपल्या घरात ईदची नमाज पठण केली.मरकज अहेले सुन्नत गौसिया मिस्जद (बाराभाई मिस्जद), मौलाना मुशाहिद रजा तसेच मौलाना अकिल रजा, मौलाना मुख्तार आलम, मौलाना सिद्दीक साहब, हाफिज साहब यांनी लोकांना घरात नमाज पठण करण्याची पद्धत समजून सांगितली.ईद यशस्वी करण्यासाठी हाजी अब्दुल रज्जाक सैय्यद, शब्बीर हकिम, कासम शेख, अहमद हकिम, मुजाहिद पटेल, जमीर काजी,तन्वीर मो. शफी, मुदीर शेख, समीर खतीब, अश्पाक सैय्यद, सलिम काझी, फिहम सैय्यद, जमीर शेख, साबीर शेख, सिकंदर हकिम, अब्दुल मोमीन कब्रस्तान व पाचही मिस्जदचे ट्रस्ट शहरातील सर्व तरूण वर्ग यांनी विशेष काळजी घेतली.यावेळी तहसीलदार राहूल कोताडे, मुख्याधिकारी संजय केदार, पोलीस निरीक्षक साहेबराव पाटील, अकुंश दराडे राहूल निरगुडे त्यांचे सर्व सहकारी यांनी मुस्लिम समाज बांधवांना शुभेच्छा दिल्या. मुस्लिम समाजाच्या वतीने अय्युब शेख यांनी आभार मानले.
मुस्लिम बांधवांनी आपल्या घरात नमाज पडत साजरी केली ईद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2020 15:47 IST
सिन्नर : ईद उल अज्हा (बकरी ईद)ची नमाज सिन्नर शहरात उत्साहात पार पडली. राज्यात व देशात कोरोना विषाणूंचा वाढता संसर्ग व सिन्नर शहर लॉकडाऊन असल्याने कोणत्याही प्रकारची गर्दी न करता शासनाने दिलेले निर्देश पाळून सर्व मुस्लिम समाज बांधवांनी आपआपल्या घरात ईदची नमाज पठण केली.
मुस्लिम बांधवांनी आपल्या घरात नमाज पडत साजरी केली ईद
ठळक मुद्दे लोकांना घरात नमाज पठण करण्याची पद्धत समजून सांगितली.