शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
3
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
4
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
5
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
6
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
7
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
8
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
9
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
10
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
11
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
12
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
13
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
14
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
15
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
16
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
17
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
18
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
19
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
20
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?

‘संगीत अयोध्येचा राजा’ मैफलीत रामभक्त तल्लीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2019 12:40 AM

श्री रामावीण मज दुसरा छंद नसावा, प्रभो मज एकच वर द्यावा.. अशा रामकथेतील विविध प्रसंगांतील वैविध्यपूर्ण गाणी तालासुरात सादर करीत बागेश्रीच्या कलाकारांनी रामभक्तांना आनंद मिळवून दिला.

भगूर : कौसल्याराणी हळू उघडी लोचनेदीपून जाय माय स्वत: पुत्रदर्शनेओघळले आसू सुखे कंठ दाटला....राम जन्मला गं सखे राम जन्मला...श्री रामावीण मज दुसरा छंद नसावा, प्रभो मज एकच वर द्यावा.. अशा रामकथेतील विविध प्रसंगांतील वैविध्यपूर्ण गाणी तालासुरात सादर करीत बागेश्रीच्या कलाकारांनी रामभक्तांना आनंद मिळवून दिला.भगूर येथील प्राचीन राममंदिरात चारूदत्त दीक्षित यांचा बागेश्रीनिर्मित ‘संगीत अयोध्येचा राजा’ हा संगीतमय कार्यक्रम संपन्न झाला. जय जय हे रघुनंदन दीक्षितांनी रचलेल्या श्रीरामाच्या स्तवनाने मैफलीचा प्रारंभ झाला. त्यानंतर स्वयें श्री रामप्रभू ऐकती, राम जन्मला गं सखे, नकोस नौके परत फिरू, सावळा गं रामचंद्र, राम का गुणगान, विजय पताका.. यांसारखी भावमधुर गाणी गायिका सावनी कुलकर्णी, शीला दंडवते यांनी सादर केली.दीपक दीक्षित व मृण्मयी कापसे यांनी सहगायन केले. विविध गीतांना चारूदत्त दीक्षित (संवादिनी), वैभव काळे (तबला), दीपक दीक्षित (तालवाद्ये) यांनी संगीतसाथ केली.मारुती भजनी मंडळाच्या गायक कलाकारांनी वीर हनुमानाची गाणी दमदार आवाजात सादर केली. या गाण्यांनी कार्यक्रमाची रंगत वाढविली. याप्रसंगी एकनाथ शेटे, रामदास आंबेकर, डॉ. मृत्युंजय कापसे यांसह परिसरातील रामभक्त, महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :NashikनाशिकReligious programmeधार्मिक कार्यक्रम