रस्त्याअभावी मुरुमटी गावाचा संपर्क तुटला

By Admin | Updated: July 24, 2016 21:38 IST2016-07-24T21:26:26+5:302016-07-24T21:38:40+5:30

पुराच्या पाण्यातून करावा लागतो खडतर प्रवास

The Murumati village's contact was broken due to the lack of roads | रस्त्याअभावी मुरुमटी गावाचा संपर्क तुटला

रस्त्याअभावी मुरुमटी गावाचा संपर्क तुटला

पेठ : तालुक्यातील अतिदुर्गम अशा मुरुमटी गावाला पावसाळा सुरू झाल्यापासून रस्त्याअभावी ये-जा करणेही कठीण झाले असून, पुराच्या पाण्यातून बिकट वाट काढावी लागत आहे.
करंजाळीपासून साधारण २५ ते ३० किमी अंतरावर असलेल्या मुरु मटी गावाला जाताना मोठा नाला आडवा लागतो. पहिल्याच पावसापासून या नात्याला पाणी आल्यानंतर गावाचा संपर्क तुटतो. वाहन घेऊन जायचे झाले तर अलीकडे वाहन उभे करून पुराच्या पाण्यातून अथवा केटीवेअर बंधाऱ्याच्या भिंतीवरून जीव मुठीत धरून पलीकडे जावे लागते. रात्री पहाटे आजारी माणसांना उपचारासाठी नेण्यात मोठया अडचणी निर्माण होत असून, गत अनेक वर्षांपासून या परिसरातील नागरिकांची पूल बांधून द्यावा ही मागणी शासनदरबारी धूळ खात पडून आहे. निवडणुकांच्या काळात दिलेली आश्वासने त्यानंतर कशी हवेत विरतात याचे उदाहरण म्हणजे मुरुमटी, असे येथील ग्रामस्थ बोलून दाखवतात. (वार्ताहर)

Web Title: The Murumati village's contact was broken due to the lack of roads

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.