बोलेरोच्या धडकेत दापूर येथील एक ठार
By Admin | Updated: August 27, 2016 23:32 IST2016-08-27T23:32:14+5:302016-08-27T23:32:25+5:30
बोलेरोच्या धडकेत दापूर येथील एक ठार

बोलेरोच्या धडकेत दापूर येथील एक ठार
सिन्नर : बोलेरोने दिलेल्या धडकेत सिन्नर तालुक्यातील दापूर येथील दुचाकीस्वार जागीच ठार झाला. शनिवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील काका ढाब्याजवळ सदरचा अपघात झाला. दापूर येथील हसन फत्तूभाई मणियार (६५) हे आपल्या दुचाकीहून (क्र. एम एच १५ डीएक्स ९८९७) दोडी बुद्रूक येथे जात होते. काका ढाब्याजवळ आले असता समोरून येणाऱ्या बोलेरोने (क्र. एमएच १७, जीडी १७१०) मणियार यांना जोरदार धडक दिली. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. वावी पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे. उपनिरीक्षक रामेश्वरी पांढरे अधिक तपास करीत आहे.